`या` महामार्गासाठी सुप्रिया सुळे घेणार गडकरींची भेट!

शहरातून जाणारा बहुचर्चित साक्री - शिर्डी राष्ट्रीय महामार्ग अवजड वाहतूक आणि दररोजच्या अपघातांमूळे मृत्युचा सापळा बनला आहे. मात्र, शेकडो कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सटाणा शहर बाह्यवळण रस्त्याचा समावेश नसल्याने जनतेमध्ये मोठी नाराजी आहे.
Sule- Gadkari
Sule- Gadkari

सटाणा : शहरातून जाणारा बहुचर्चित साक्री - शिर्डी (Sakri-Shirdi highway) राष्ट्रीय महामार्ग (National Highway) अवजड वाहतूक आणि दररोजच्या अपघातांमूळे (Road accidents) मृत्युचा सापळा बनला आहे. मात्र, शेकडो कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सटाणा (Satana) शहर बाह्यवळण रस्त्याचा समावेश नसल्याने जनतेमध्ये मोठी नाराजी आहे. 

वळण रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावण्यासाठी केंद्रीय सडक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावावा, याकरीता बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण (Deepika Chavan) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांना साकडे घातले आहे. 

यासंदर्भात माजी आमदार श्रीमती चव्हाण यांनी मुंबई येथे शरद पवार आणि खासदार सुळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. सटाणा शहरातून जाणाऱ्‍या राज्य महामार्गास केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ असा दर्जा दिलेला आहे. गुजरात राज्याला जोडणारा सर्वात जवळचा महामार्ग असल्याने शहरातून दररोज मोठी अवजड वाहतूक होत असते. त्यामुळे शहर परिसरात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. शहर वळण रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने हे काम त्वरित पूर्ण व्हावे, अशी मागणी शहरातील नागरिक सातत्याने करीत आहेत. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. 

या महामार्गाच्या एकूण १२८.६५० किलोमीटर लांबीपैकी पिंपळनेर ते सटाणा भाग २, चांदवड ते मनमाड भाग ४ या लांबीत रस्ते विकास महामंडळातर्फे ठेकेदाराची नियुक्ती करून कॉंक्रीटीकरणासह रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र, या मंजूर कामात सटाणा शहर बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा समावेशच केलेला नाही. शहरातून जाणाऱ्‍या सटाणा ते चांदवड भाग ३ या ६४ ते १०४ किलोमीटर अंतरासाठी आजपर्यंत कोणतेही काम मंजूर झालेले नाही.

या वळण रस्त्याचे काम २०१९ - २० च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मंजूर न झाल्याने २०२० - २१ च्या आर्थिक वर्षाच्या मंजुरीकरीता परिवहन व भूपृष्ट मंत्रालयाच्या स्थायी आर्थिक समितीत समाविष्ट होण्यासाठी १२.८० किलोमीटर लांबीचा ६४ कोटी रुपयांच्या भूसंपादनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याप्रश्‍नी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत बैठक बोलावावी आणि हे काम तत्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणीही श्रीमती चव्हाण यांनी निवेदनात केली आहे. 

...
सटाणा शहरातील नागरिकांची सुरक्षितता महत्वाची असल्याने शहराला बाह्यवळण रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे. बागलाणच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमी न्याय दिला आहे. नागरिकांची सुरक्षा आणि शहरातील वाहतुकीची गरज लक्षात घेता लवकरच दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावणार आहे. 
- सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस  
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com