उड्डाणपुलाच्या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचीही उडी! 

महापालिकेकडून त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथे नव्याने तयार होत असलेल्या उड्डाणपुलाच्या वाढीव ४४ कोटींच्या किमतीवरून शिवसेना व भाजपमध्ये वाद सुरू असतानाच या वादात आता शहर राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे.
NMC NCP F.
NMC NCP F.

नाशिक : महापालिकेकडून त्रिमूर्ती चौक (Trimurti Chowk) व मायको सर्कल (Mico circle) येथे नव्याने तयार होत असलेल्या उड्डाणपुलाच्या वाढीव ४४ कोटींच्या (44 crore`s Flyover bridge) किमतीवरून शिवसेना (Shivsena) व भाजपमध्ये (BJP) वाद (Dispute) सुरू असतानाच या वादात आता शहर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) उडी घेतली आहे. पुलाचे काम तातडीने थांबविण्याबरोबरच दर्जेदार संस्थांकडून सल्ला घेऊनच काम करावे, अशी मागणी महापालिका आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांच्याकडे केली आहे. 

अडीचशे रुपये किमतीच्या पुलांच्या कामाचे श्रेय घेण्यावरून सुरवातीला सत्ताधारी भाजप व शिवसेनेत कलगीतुरा रंगला होता. त्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी विकासकामांसाठी निधी आवश्‍यक असल्याने पुलाचे काम थांबवून तो निधी नगरसेवकांच्या विकासकामांकडे वळविण्याची मागणी केल्यानंतर वाद विकोपाला गेला. त्यानंतर पुलाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंटची प्रत वाढविण्याचे कारण देत पुलाचे काम घेतलेल्या संस्थेकडून तब्बल ४४ कोटी रुपये अतिरिक्त मागणी करण्यात आल्याने वाद निर्माण झाला.

त्यानंतर पुलासाठी नियुक्त केलेल्या सल्लागार संस्थेचा मुद्दा समोर आला. बीओटी प्रकल्पांच्या सल्लागार संस्था नियुक्तीवरून शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडल्यानंतर आयुक्तांनी बीओटीसाठी नवीन सल्लागार संस्था नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रीया राबविली, तर शिवसेनेने त्यापूर्वी शासनाकडे धाव घेतली. भाजपने हाच धागा पकडून पुलांच्या सल्लागार संस्थेच्या नियुक्तीवरून शिवसेना शासनाकडे धाव घेणार का, असा सवाल उपस्थित करीत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. उड्डाणपुलाच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. 

सक्षम सल्लागारासाठी निवेदन 
त्र्यंबक रोडवरील मायको सर्कल जंक्शन व सिटी सेंटर ते त्रिमूर्ती चौक अशा दोन्ही ठिकाणी सुमारे २५० कोटीचे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. शहरात होणाऱ्या विकासकामात राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही अडथळा निर्माण केला नाही. परंतु, सदर उड्डाणपुलाच्या अंतिम किमतीत ४४ कोटी रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव आला आहे. दोन्ही उड्डाणपुलासाठी नेमलेल्या सल्लागारास पूल उभारण्याचा कुठलाही अनुभव नसताना त्यांच्याकडून रचना व अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यामुळे पुलाचे काम तातडीने थांबवावे. तसेच एल. ॲन्ड टी, टाटा किंवा आयआयटी या दर्जेदार संस्थेकडून सल्ला घेऊन तांत्रिक बाबींची तपासणी करावी, अशी मागणी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी करताना तसे न झाल्यास पुलाचे काम होऊ देणार नसल्याचा इशारा दिला. 

मुंबई नाका येथे सिग्नल 
मुंबई नाका येथे मोठ्या प्रमाणात रहदारी वाढल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे द्वारका सर्कल प्रमाणे येथील वाहतूक बेट कमी करून सिग्नल बसविण्याची मागणी शहराध्यक्ष ठाकरे यांनी केली. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com