द्राक्ष क्लस्टरच्या बैठकीत डावलल्याने खासदार भारती पवार संतप्त! - M.P. Bharti Pawar Angry on NHB late Cluster invitation, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

द्राक्ष क्लस्टरच्या बैठकीत डावलल्याने खासदार भारती पवार संतप्त!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 जून 2021

केंद्र सरकारने नुकतीच द्राक्ष क्लस्टरच्या प्रायोगिक तत्वावर उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पासाठी  १०० कोटींचा निधी महाराष्ट्राला मंजूर केला. नाशिकच्या कृषी विभागासाठी हा निधी मंजूर झाला आहे. या द्राक्ष क्लस्टरच्या आढावा बैठकीचे निमंत्रण ऐनवेळी मिळाल्याने आपल्याला जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप खासदार डॉ भारती पवार यांनी केला आहे. संतप्त खासदार पवार यांनी याबाबत वरिष्ठाकंडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

नाशिक : केंद्र सरकारने नुकतीच द्राक्ष क्लस्टरच्या प्रायोगिक तत्वावर उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पासाठी  १०० कोटींचा निधी महाराष्ट्राला मंजूर केला. (Central Government sanction 100 crores for grape cluster) नाशिकच्या कृषी विभागासाठी हा निधी मंजूर झाला आहे. या द्राक्ष क्लस्टरच्या आढावा बैठकीचे निमंत्रण ऐनवेळी (Invitation of meeting gate late) मिळाल्याने आपल्याला जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप खासदार डॉ भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी केला आहे. संतप्त खासदार पवार यांनी याबाबत वरिष्ठाकंडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

केंद्र सरकारकडून द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा म्हणून त्याची निवड केली. त्यातील दिंडोरी, निफाड, चांदवड भागात अतिशय गुणवत्तापूर्ण द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. प्रायोगिक तत्वावर पायलट प्रोजेक्ट अंतर्गत केंद्रस रकारच्या (राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (एन. एच. बी.) च्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. 

भारतात अशा प्रकारचे प्रोजेक्ट प्रायोगिक तत्वावर करण्यात येत आहेत. खासदार डॉ. पवार यांनी आभार मानले. केंद्र सरकार नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीची द्राक्ष शेती तसेच उत्पादन वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यातूनच हा प्रकल्प करण्यात येत आहे. परंतु नाशिकच्या कृषी विभागाच्या या प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी  कुठलीही पूर्वसूचना न देता,  लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता घाईघाईने परस्पर बैठक आयोजित केली. त्याचा  खासदार पवार यांनी निषेध केला आहे.

त्या म्हणाल्या, एखादी शासकीय योजना जर यशस्वी करायची असेल, तर  शेतकरी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांच्यात समन्वय असावा लागतो. ते गरजेचे असते, असे असतांना संबंधित प्रकल्पाच्या बैठकीसाठी लोकप्रनिधी, द्राक्ष बागायतदार संघातील संचालक, द्राक्ष बागायतदार शेतकरी हे अशा महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहू शखले नाहीत. त्यांच्या अडचणी, सूचना अधिकारी ऐकून घेणार नसतील तर अशा लोकपयोगी योजना कशा पूर्णत्वास जातील?. याचे सरळसरळ नुकसान शेतकऱ्यांनाच होईल. किमान लोकप्रतिनिधींच्या सूचना घेण्यासाठी लोकप्रतिनिधींना  विश्वासात घेणे गरजेचे आहे.
..
हेही वाचा...

ओबीसी आरक्षण आंदोलनातून भुजबळांचे शक्तीप्रदर्शन यशस्वी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख