ओबीसी आरक्षण आंदोलनातून भुजबळांचे शक्तीप्रदर्शन यशस्वी - Chhagan Bhujbal success in OBC reservation agitation, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

ओबीसी आरक्षण आंदोलनातून भुजबळांचे शक्तीप्रदर्शन यशस्वी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 जून 2021

सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले `ओबीसी` आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी आज जिल्ह्यात सोळा ठिकाणी रास्ता रोको व धरणे धरण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. मात्र यानिमित्ताने ओबीसी समजघटकांच्या प्रuccश्नावर जागरूक असल्याचा, समाजातील नाराजीची भावना प्रकट करण्याचा हेतू सफल झाला. शहरातील आंदोलनातील कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षात घेता शक्तीप्रदर्शन करण्यात ते यशस्वी झाले. 
 

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले `ओबीसी` आरक्षण कायम (OBC Reservation should be kept as it is) ठेवावे या मागणीसाठी आज जिल्ह्यात सोळा ठिकाणी रास्ता रोको व धरणे धरण्यात आले. (Workers made agitaion against Government)  यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. मात्र यानिमित्ताने ओबीसी समजघटकांच्या प्रश्नावर जागरूक असल्याचा, समाजातील नाराजीची भावना प्रकट करण्याचा हेतू सफल झाला. शहरातील आंदोलनातील कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षात घेता शक्तीप्रदर्शन करण्यात मंत्री छगन भुजबळ (Success in Demonstration of strength) ते यशस्वी झाले. 

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेसह विविध समविचारी, ओबीसी संघटनांनी आज शहराच्या मध्यवर्ती व गर्दीचा परिसर असलेल्या द्वारका चौफुलीवर रास्ता रोको केला. या आंदोलनाने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता गृहित धरून सकाळी नऊपासूनच येथे मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे परिसरात जमलेले कार्यकर्ते वेगवेगळ्या दिशांनी दुपारी बाराला आंदोलनासाठी चौकात आले. त्यांनी रस्त्यावर झोपून घेत आंदोलन केले. 

विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली द्वारका व मुंबई नाका येथे आंदोलन झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी आणि ओबीसी जनगणनेसह विविध मागण्यांसाठी केंद्र सरकार विरुद्ध हे आंदोलन होईल. आंदोलनप्रश्‍नी भुजबळ फार्म कार्यालयात संघटनेचे सलग दोन नियोजन सुरु होते.

यावेळी श्री. खैरे म्हणाले, की पालकमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई लढत आहेत. सामाजिक पातळीवर सर्व ओबीसी संघटना रस्त्यावर उतरून ओबीसी समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोचविण्यासाठी आजचे आंदोलन होते. त्यासाठी जिल्हा, शहर व तालुका पातळीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनात अंबादास खैरे, संतोष सोनपसारे, समाधान जेजुरकर, विजय राऊत, छबू नागरे, सागर बेदरकर, नगरसेवक संतोष गायकवाड, नगरसेविका समिना मेमन, अनिता भामरे, माजी नगरसेविका कविता कर्डक, नाना पवार, संजय खैरनार, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, सदाशिव माळी, समाधान जाधव, विक्रम नागरे, श्रीराम मंडळ, योगेश कमोद, संतोष कमोद, योगेश निसाळ, आशा भंदूरे, दिलीप तुपे, नंदन भास्करे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

आंदोलन यशस्वी
इतर मागास वर्गीयांचे राजकीय व अन्य आरक्षण कायम रहावे ही भूमिका घेऊन आमचे नेते व राज्याचे सार्वजनिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ काम करीत आहे. यासंदर्भात गेले काही दिवस या प्रश्नावर जनजागृती केली आहे. या पार्श्वभूमीवर काल पोलिसांनी आम्हीला आंदोलन करू नये अशी विनंती केली होती. मात्र आम्ही ठाम होतो. त्यानुसार आंदोलन झाले. राज्य शासनाने देखील याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आमचे आंदोलन यशस्वी झाले. 
- दिलीप खैरे, जिल्हा अध्यक्ष, अ. भ. महात्मा फुले समता परिषद.
...

हेही वाचा...

ओबीसी आरक्षणप्रश्नी केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष?

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख