पोलिसांच्या हातावर तुरी देत मनसेचे मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन 

मंदिरे उघडण्यासाठी श्री काळाराम मंदिराबाहेर विनापरवानगी आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलनाचा प्रयत्न फसला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर राज्यातील पहिलेच आंदोलन करण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा येथे जमले होते.
MNS # sep
MNS # sep

नाशिक : मंदिरे उघडण्यासाठी (Open Temples in the city)  श्री काळाराम मंदिराबाहेर विनापरवानगी (Shree Kalaram Mandir) आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी (Police arrest MNS workers gathered for Agitation)  ताब्यात घेतल्याने आंदोलनाचा प्रयत्न फसला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर राज्यातील पहिलेच आंदोलन करण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा येथे जमले होते. 

कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असून, शासनाने राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी भाजपने राज्यव्यापी आंदोलन छेडले होते. या आंदोलनात मनसेनेही उडी घेतली असून, शासनाने मंदिरे उघडण्याचा निर्णय न घेतल्यास मंदिराबाहेर घंटानाद केला जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. ठाकरे यांनी हा इशारा देऊन काही तास उलटत नाही तोच नाशिकमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी पंचवटीतील काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी (ता.२) सकाळी आंदोलन छेडले. मंदिराबाहेर ‘हिंदूविरोधी बिघाडी सरकार’ असा फोटो लावून आरती करण्यात आली.

या आंदोलनाची कुणकूण लागताच पंचवटी पोलिसांचे गुन्हे शाखा पथक या ठिकाणी पोचले आणि मनसेच्या १६ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये ३ महिला कार्यकर्त्यांचाही समावेश असून, या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मनसेचे मनोज घोडके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सुजाता डेरे, सचिन भोसले, निखिल सरपोतदार, सौरभ सोनवणे, संदीप भंवर, विजय ठाकरे, नवनाथ जाधव, अक्षय खांडरे, भाऊसाहेब निमसे, अरुण दातीर, बब्बू पाटील, वैशाली पोतदार, मुक्ता इंगळे, समीर ब्राम्हणकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

...
श्री काळाराम मंदिर येथे मनसेतर्फे मंदिरे उघडण्यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, गुन्हे पथकासह आंदोलनस्थळी जाऊन १६ जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी तीन महिला कार्यकर्त्या असून, या सर्व कार्यकर्त्यांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करीत आहोत. 
- सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com