मंत्री विजय वडेट्टीवारांना घरचा रस्ता दाखवा!

काँग्रेसचे मंत्री मतांचे राजकारण साधण्यासाठी शिवशाहूंचे वारस असलेले छत्रपती खासदार संभाजी राजे यांच्याविषयी आपली असभ्य भाषेचा वापर करीत आहेत. त्यांना मंत्रीपदावरून घऱचा रस्ता दाखवावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयकांनी केली आहे.
CHhava
CHhava

नाशिक : छत्रपती हा सकल महाराष्ट्राचा श्वास आहे. हा श्वास कोंडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाहिस्तेखान प्रवृत्तींची बोटे छाटण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. याची जाणीव ठेवूनच छत्रपतींच्या घराण्याविषयी भाष्य करण्याचे धाडस ठेवावे. काँग्रेसचे मंत्री मतांचे राजकारण साधण्यासाठी शिवशाहूंचे वारस असलेले छत्रपती खासदार संभाजी राजे (Chhatrapati Sambhajiraje) यांच्याविषयी आपली असभ्य भाषेचा वापर करीत आहेत. त्यांना मंत्रीपदावरून घऱचा रस्ता दाखवावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti morcha) राज्य समन्वयकांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पदाधिकारी म्हणाले, खासदार, छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी कोही लोक काल्पनिकता नको तितकी ताणतात. याच जातकुळीची परंपरा पुढे नेण्याचा अट्टाहास करतांना मंत्री वड्डेटीवार यांनी  पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. संभाजीराजेंच्या मनातही नसलेले शब्द ओठावर आणण्याचे धाडस कसे होते?. 

यावेळी करण गायकर म्हणाले, या मंडळींना आज सत्तेचे जे लोणी चाखायला मिळत आहे, ती छत्रपती शिवाजी महाराज व शाहु महाराजांची पुण्याई आहे, याचे भान या मंडळींना नाही. ज्या आरक्षणावरून वडेट्टीवार नावाच्या वाचाळवीराने गरळ ओकली त्या महाभागाला शिवशाहुंना गुरूस्थानी मानणारे महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आरक्षणाची ऊब भोगायला मिळत आहे, ते उपकारही हे नतद्रष्ट कसे विसरले?

केंद्रीय  मंत्री राणें यांची भाषा सभ्य नव्हतीच, तीचे समर्थन होणार नाही  म्हणून त्यांच्यावर झालेल्या  कारवाईचे आमच्यासह समाजाने स्वागत केले. मग छत्रपतींच्या घराण्यावर धनगराची काठी उगारण्याची भाषा कुठल्या सभ्यतेत बसते?.  मंत्री वड्डेटीवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे धाडस सरकार दाखवणार  का? असा आमचा सरकारला सवाल आहे.

श्री. वडेट्टीवार ज्या महाराजांबद्दल बोलत आहेत, ते छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज व आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांचे वंशज आहेत. याचं तरी भान त्यांनी ठेवायला हवे होतं. परंतू बेभान झालेले वडेट्टीवार नेहमीच बेताल वक्तव्य करतात. यातून ते काँग्रेस पक्षाला रसातळाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांना मराठा द्वेष करता करता आत्मनाश ओढवून घ्यायचा आहे का?.

घटनात्मक प्रक्रीयेतून स्थापन झालेला एखादा आयोग बोगस कसा असू शकतो?. मराठा समाजाला आरक्षण देताना राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करून मराठा समाजाच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले. हे वडेट्टीवारांना ठाऊक नाही का?.  ओबीसी आरक्षण देताना कोणत्या जातीचे  सर्वेक्षण झाले आहे? असा प्रश्न उपस्थित केला तर?.  
विजय वडेट्टीवार यांनी घेतलेली भूमिका या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची आहे, त्यांच्या भूमिकेला साजेसा लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व नेमके कोणत्या कोणत्या जातीना मिळालं याचा हिशोब पुन्हा नव्याने घ्यायला हवा आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नसून प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे. 

जबाबदार मंत्री म्हणून काम करणाऱ्या विजय वडेट्टीवार यांनी राज्यात आग लावण्याचे प्रयत्न बंद करावेत. उचलली जीभ लावली टाळ्याला असं न करता आणि पुन्हा एकदा मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणानुसार ओबीसी आरक्षणाचे सर्वेक्षण करावे. आपल्या स्वार्थापोटी दोन समाजामध्ये वाद लावण्याचे काम विजय वडेट्टीवार यांनी आता थांबवावे. समाजा- समाजात वाद निर्माण करणाऱ्या या मंत्र्याचा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा. काँग्रेस पक्षाने देखील मंत्री वडेट्टीवार यांचा बंदोबस्त केला नाही तर, येणाऱ्या काळात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या विरोधात मराठा समाजाला उघड विरोधात भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. 

यावेळी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर, सचिन पवार, प्रमोद जाधव, आशिष हिरे, चेतन शेलार, पूजा धुमाळ, अस्मिता देशमाने, योगेश गांगुर्डे, दिनेश नरवडे, कल्पेश पाटील, भारत इंगळे, बंटी भागवत उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com