आमदार हिरे यांनी कापला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिकृतीचा केक  - MLA Hire cut NCP picture cake, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

आमदार हिरे यांनी कापला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिकृतीचा केक 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 जुलै 2021

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार सीमा हिरे यांनी वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पक्षाचे चिन्ह असलेला केक कापून वाढदिवस साजरा केला.

सिडको : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार सीमा हिरे (Seema hire) यांनी वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पक्षाचे चिन्ह असलेला केक (She cut a cake of NCP piarty & leaders picture) कापून वाढदिवस साजरा केला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अंकुश वराडे यांनी आमदार हिरे यांच्या सिडकोच्या संपर्क कार्यालयात भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी आणलेल्या केकमुळे उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. 

केकवर पालकमंत्री छगन भुजबळ व माजी आमदार अपूर्व हिरे यांचे छायाचित्र रंगविले होते. त्याखालोखाल राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह व खाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस, असे नाव लिहिले होते.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या या केकवर भाजप आमदारांना ‘कार्यसम्राट’ अशी पदवी बहाल केली होती, हे विशेषच म्हणावे लागेल. या वेळी आमदार हिरे यांनी केक कापला व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तो त्यांना भरविला. भाजप आमदाराच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या या केकची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडावर भाजप आमदारांनी राष्ट्रवादीचा केक कापला, अशीच चर्चा ऐकायला मिळत होती.

या वेळी महेश हिरे, नगरसेविका अलका अहिरे, कैलास आहिरे, अंकुश वराडे, राकेश ढोमसे, सुशील नाईक, दिनेश अहिरे, गणेश अरिंगळे, डॉ. वैभव महाले, महेंद्र पाटील, अविनाश पाटील आदींसह भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
...
हेही वाचा...

आदिवासी संशोधन, प्रशिक्षण व शिक्षण संस्था नाशिकला स्थलांतरीत करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख