नाशिक कायमचे कोरोनाच्या रेड झोन बाहेर ठेवा

जिल्ह्यात कडक निर्बंधामुळे कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र अद्याप मृत्यूदर घटलेला नाही. कोरोनाचा पॉझेटिव्हीटी रेट कमी करण्याच्या दृष्टीने आणि जिल्हा कायम रेड झोन बाहेर राहण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परांत समन्वय ठेवावा, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
Yeola Meeting
Yeola Meeting

नाशिक : जिल्ह्यात कडक निर्बंधामुळे कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली (Covid19 in control in nashik district) आहे. मात्र अद्याप मृत्यूदर घटलेला नाही. (Death rate not in control) कोरोनाचा पॉझेटिव्हीटी रेट कमी करण्याच्या दृष्टीने आणि जिल्हा कायम रेड झोन बाहेर राहण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परांत समन्वय ठेवावा, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी केले.

येवला शासकीय विश्रामगृहामध्ये येवला व निफाड तालुक्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती, उपाय योजना आणि विकास कामांची आढावा  बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, शहरातील कोरोना रूग्णांचे गृहविलगीकरण करू नये. ज्या रूग्णांचे यापूर्वी गृहविलगीकरण करण्यात आले आहे त्यांना  त्वरीत शासकीय रूग्णालयात स्थलांतरीत करून उपचार सुरू करावेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने व लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपायोजना कराव्यात. कोरोना साथरोगाच्या अनुषंगाने बाजारात होणारी गर्दी टाळावी. सामाजिक अंतराचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे. शहरात स्वच्छता ठेवावी  व पावसाळापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करावीत.

`शिवसृष्टी`साठी निधी मंजूर
यावेळी तालुक्यांतील पाणी टंचाई बाबत पालकमंत्री भुजबळ यांनी पाणीपुरवठा टँकर्सचा आढावा घेतला. येवला शहर व तालुक्यातील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे. शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज वाटप वेळेत करण्यात यावे. येवला शहरातील नियोजित शिवसृष्टी प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला आहे. त्याबाबत  निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना   दिल्या.

यावेळी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, प्रांताधिकारी सोपान कासार (येवला), डॉ. अर्चना पठारे (निफाड), तहसीलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, गट विकास अधिकारी उन्मेष देशमुख, संदीप कराड, उपअभियंता उन्मेश पाटील, पोलिस निरीक्षक सर्वश्री अनिल भवारी, संदीप कोळी, राहुल वाघ आदी उपस्थित होते.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com