मोदींना अपयशी म्हणता, पण काँग्रेसवाल्यानो तुमचे काय? - Congress blaim Modi fail, then How about congress in Nashik? | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींना अपयशी म्हणता, पण काँग्रेसवाल्यानो तुमचे काय?

संपत देवगिरे
रविवार, 30 मे 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या सात वर्षात अपयशी झाले, असा आरोप काँग्रेस पक्षाने आज केला. मात्र यावेळी शहरातील काँग्रेसची संघटनात्मक, जनतेच्या व शहराच्या प्रश्नांवरील भूमिका व स्थिती पाहिली तर त्यांना असा आरोप करण्याचा तरी अधिकार पोहोचतो का?. असा प्रश्न पडतो. जर भाजप अपयशी असेल तर काँग्रेसने तरी नाशिकमध्ये यशस्वी म्हणावे असे काय केले?.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या सात वर्षात अपयशी झाले, असा आरोप काँग्रेस पक्षाने आज केला. (P.M. Narendra Modi fail to serve nation, said Congress) मात्र यावेळी शहरातील काँग्रेसची संघटनात्मक, जनतेच्या व शहराच्या प्रश्नांवरील भूमिका व स्थिती (Whats roll of Congress on Organisation & City issue is not satisfactory)  पाहिली तर त्यांना असा आरोप करण्याचा तरी अधिकार पोहोचतो का?. असा प्रश्न पडतो. जर भाजप अपयशी असेल तर काँग्रेसने तरी नाशिकमध्ये (Is Congress successful to blaim BJP) यशस्वी म्हणावे असे काय केले?.

नाशिक शहरात सध्या पर्यावरणाच्या दृष्टीने पश्चिम घाटातील सर्वात संवेदनशील व गोदावरी आणि वैतरणा या दोन नद्यांचा संगम व राज्यातील सर्वाधीक पाऊस होणाऱ्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी उत्खननाच्या तक्रारी आहेत. गेल्या महिन्यात तर ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी थेट खोदकाम सुरु झाल्याच्या तक्रारी आल्या. धार्मिकदृष्या देशभरातील आस्थेशी हा विषय निगडीत आहे. राज्य सरकारच्या महसूल खात्याशी, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी हा प्रश्न निगडीत आहे. मात्र यासंदर्भात मंत्री थोरात यांना विचारल्यावर त्यांनी त्याविषयी अनभिज्ञता व्यक्त केली. श्री. थोरात यांनी याबाबत घेतलेली भूमिका वास्तववादी आहे. राज्याचा कारभार करतांना एखाद्या शहराच्या प्रश्नाबाबत त्यांना माहिती असेल अशी अपेक्षा करणे न्याय्य नाही. मात्र मग स्थानिक काँग्रेसची मंडळी काय करते?. त्यांनी तरी काय केले?. त्यांनी या विषयावर कोणती भूमिका घेतली?. या निद्रीस्त नेत्यांना कोणती भूमिका घ्यायचीच नसेल तर किमान आपल्या पक्षाच्या मंत्र्याला तर त्याबाबत कळवून त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचे श्रेय घेता आले असते. मात्र तसे काहीच घडलेले नाही.

जर एखाद्या सरकार, पक्षाला आपण अपयशी असल्याचा आरोप करत असू, तर किमान त्या पक्षाच्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांनी आपल्या कार्यक्षेत्रात तरी आपला पक्ष यशस्वी आहे, असे सांगण्याएव्हढे काम, हालचाली केल्या पाहिजेत. तसे झाले तर त्याची लोकांत चर्चा होईल. तो पक्ष यशस्वी आहे असे म्हणता येईल. तसे नसेल तर इतरांकडे बोट करताना चार बोटे आपल्याकडेही असतात, याचा विचार केलेला बरा. हे अपयश प्रदेश नेते किंवा मंत्र्यांचे नव्हे तर स्थानिक नेत्यांचे आहे.

जिल्हा परिषद सदस्य कुठे गेले? 
श्री. थोरात यांचा गेली अनेक वर्षे नाशिक जिल्ह्याच्या काँग्रेसशी जवळचा संबंध आहे. गेल्या पाच वर्षात राज्याच्या काँग्रेसची सूत्रे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, श्री. थोरात आणि सध्या नाना पटोले यांच्याकडे आली. राज्यात तीन प्रदेशाध्यक्ष बदलले. नाशिक शहराचा अध्यक्ष होता तोच राहिला. एव्हढेच नव्हे तर सध्या मात्र या शहराध्यक्षाला प्रदेश उपाध्यक्षपदी पदोन्नती देण्यात आली. या पदोन्नतीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

जिल्ह्यात पक्षाचे आठ जिल्हा परिषद सदस्य आहेत. सभापती अश्विनी आहेर व रेखा पवार या दोनच सदस्या पक्षाच्या कार्यक्रमात दिसतात. अन्य सहा सदस्य कुठे आहेत?. यातील नयना गावित शिवसेनावासी झाल्या. लोकसभा निवडणूकीत दोन सदस्य रामदास चारोस्कर (दिंडोरी) यांच्याबरोबर गेले. यशवंत गवळी हे नाराज आहेत. जिल्हा अध्यक्षांना तरी त्यांना कार्यक्रमात सहभागी करता आले काय?. काँग्रेस पक्ष सेवाकार्य नव्हे तर राजकारण करतो आहे. त्याचे यश किती सदस्य विजयी झाले, किती मते मिळाली यावर ठरते. त्याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांचेही जरा परिक्षण करायला नको का?. त्याचा विचार केला तर या पदाधिकाऱ्यांना यशस्वी म्हणावे का?

माहिती घेऊन कारवाई करणार
मोदी सरकार गत सात वर्षात सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप श्री. थोरात यांनी केला. यावेळी त्र्यंबकेश्‍वर येथील ब्रह्मगिरी डोंगरावरील वादग्रस्त खोदाईबाबत पत्रकारांनी महसूलमंत्री म्हणून तुमची भुमिका काय असा प्रश्‍न केला. यावेळी त्यांनी हे प्रकरण आपल्याला आताच कळाल्याचे सांगितले. याबाबत योग्य माहिती घेऊन कारवाई करू, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.
....

अनिल परब यांच्यावर गैरव्यवहाराचा मेल करून गजेंद्र पाटील गायब का झाला? 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख