जळगाव पालिका कर्मचारी होणार मालामाल!

महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांसाठीही चांगली बातमी आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे हे कर्मचारी आता मालामाल होणार आहेत.
Jalgaon f
Jalgaon f

जळगाव : महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांसाठीही चांगली (Good news for jalgaon Municiple employee)  बातमी आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना (Seventh pay commission will impliment) सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे हे कर्मचारी आता मालामाल (Employee get financial relief) होणार आहेत. 

जळगाव महापालिकेतील कर्मचाऱ्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी आमदार सुरेश भोळे, माजी महापौर भारती सोनवणे, विद्यमान महापौर जयश्री महाजन यांनी सकारात्मक भूमिका घेत शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या सहकार्याने महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी कर्मचारी संघटनेकडून केली जात होती. त्यानुसार मंगळवारी झालेल्या निर्णयात महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

समन्वय समितीचा पाठपुरावा 
सातव्या वेतन आयोगासाठी महापालिका कर्मचारी समन्वय समिती गठित केली होती यात उदय पाटील, अरविंद भोसले, सुशील साळुंखे, एस. एस. पाटील, राजेंद्र पाटील, विलास सोनवणी, बाळासाहेब चव्हाण, सुनील गोराणे, दीनानाथ भामरे, संजय अत्तरदे, नरेंद्र चौधरी, शरद बडगुजर, चंद्रकांत वांद्रे, अनिल पाटील, वसंत सपकाळे, लक्ष्मण सपकाळे, डॉ. विकास पाटील, सुहास चौधरी, चंद्रकांत सोनगिरे, गोपाळ लुल्हे, अविनाश बाविस्कर, रवी कदम, दीपक फुलमोगरे यांचा समावेश आहे. समितीतर्फे आमदार सुरेश भोळे, माजी महापौर भारती सोनवणे, विद्यमान महापौर जयश्री महाजन यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. 

पाच टप्प्यांत मिळणार फरक 
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यास व प्रत्यक्ष वेतन १ जानेवारी २०२१ पासून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. महापालिकेने आर्थिक स्थिती विचारात घेऊन २०१६ ते २०२० या कालावधीतील थकीत फरक पाच टप्प्यांत देण्याचे आदेशात नमूद केले आहे.  
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com