मोदीजी, मंत्री बदलण्यापेक्षा इंधन दरवाढ कमी करा! - Jalgaon District Congress today organized a bicycle rally against fuel price hike | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

मोदीजी, मंत्री बदलण्यापेक्षा इंधन दरवाढ कमी करा!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 जुलै 2021

जळगाव जिल्हा काँग्रेस भवनापासून या सायकल यात्रेस सुरुवात झाली,

जळगाव : ''मोदी सरकार हाय.. हाय.., इंधनाचे दर कमी करा'' अशा घोषणा देत जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे आज महागाई विरोधात सायकल रॅली काढण्यात आली. याला मोठा प्रतिसाद मिळाला.

जळगाव जिल्हा काँग्रेस भवनापासून या सायकल यात्रेस सुरुवात झाली, माजी खासदार उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. ''मोदी सरकार हाय.. हाय.., इंधनाचे भाव कमी करा,'' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात आले.

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील म्हणाले, ''इंधन दरवाढीमुळे सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. हे दर मोदी सरकारने त्वरित कमी करावे.'' आमदार शिरीष चौधरी म्हणाले, ''मोदी सरकारने मंत्री बदलून काहीही होणार नाही. त्यांनी मंत्र्याच्या कामाकडे लक्ष देऊन इंधन दर कमी करून सर्व सामान्य माणसाला दिलासा द्यावा. मोदी सरकारला जाग आणण्यासाठी या सायकल रँलीचे आयोजन केलं आहे. मोदींनी इंधन दरवाढ कमी केली नाही तर त्यांना पुढच्या निवडणुकीत त्यांची किंमत मोजावी लागेल'' काँग्रेसच्या या आंदोलनास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

फडणवीस सरकारच्या ''चिक्कीताईं''चे काय हाल चालू आहे ते बघा!
लोणावळा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काल लोणावळा येथे काँग्रेस कार्यक्रर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी नाना पटोले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला. प्रसारमाध्यमांशी पटोले बोलत होते. 
Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख