फडणवीस सरकारमधील ''चिक्कीताईं''चे काय हाल चालू आहे ते बघा!

पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की खरेदी घोटाळा प्रकरणातआरोप झाला होता.
Sarkarnama Banner - 2021-07-10T112258.997.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-10T112258.997.jpg

लोणावळा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काल लोणावळा येथे काँग्रेस कार्यक्रर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी नाना पटोले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला. प्रसारमाध्यमांशी पटोले बोलत होते. Nana Patole criticizes BJP leader Pankaja Munde

पर्यटन स्थळ म्हणून लोणावळ्याचा फारसा विकास झाला नाही, असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, ''लोणावळा मधील चिक्की ही फार प्रसिद्ध आहे. मात्र,  फडणवीस सरकारने या ''चिक्कीला'' फेमस केली होती. आता त्या ''चिक्कीताईं''चे काय हाल चालू आहे ते बघा.''

देवेंद्र फडणवीस सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की खरेदी घोटाळा प्रकरणाचा आरोप झाला होता. त्यानंतर चिक्की खरेदीच्या चौकशीसाठी, मुख्य सचिव आणि दोन सचिव यांची समिती नेमली होती. चिक्की खरेदी प्रकरणावर विधान परिषदेत गोंधळ झाला होता. 

बारामतीसाठी मला प्लॅनिंग करावे लागेल.

''बारामतीमध्ये कॉंग्रेसला मानणारा बराच मोठा वर्ग आहे. तिथे मला प्लॅनिंग करावे लागेल. तिथे होणाऱ्या अत्याचार व्यवस्थेच्या विरोधात जो उद्रेक आहे. तो मला माहिती आहे. मात्र, आपल्याला पुढे जायचे असेल तर दुष्मानाला घरातच जाऊन मारले पाहिजे,'' असा खोचक टोला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. नाना पटोले म्हणाले की, मोठ्या जहाजांना लवकर बुडण्याची भीती असते.  लहान होडी इकडून तिकडे लवकर निघून जाते. माझा इशारा तुम्ही समजून घ्या. मी  पुण्याच्या दैाऱ्याला आलो तर तिकडे मोठ्या जहाजांना फार त्रास होतो, शत्रुकडे फार लक्ष न देता आपण आपल्या घराकडे लक्ष देऊ, असे नाना पटोले यांनी सांगितले.

 तुम्ही कामाला लागा

''पुण्याचे  पालकमंत्री अजित पवार हे बारामतीचे आहे, कोणत्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कामाला येत नाही. कोणत्याही कमिटीवर  घ्यायचं असेल तर पालकमंत्र्यांची सही लागते. हा जो त्रास पालकमंत्री देतात त्या त्रासाला तुम्ही आपली ताकद बनवा,'' असेही पटोले म्हणाले. ''काँग्रेस स्वबळावर लढणार याबाबत मी बोललो आहे. माझी माघार नाही. स्वबळावर लढाईला आपण कामाला लागा. काल मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिवसैनिकांना सांगितलं तुम्ही कामाला लागा. मी बोलत होतो तर त्रास होत होता ते बोलले तर ठीक आहे,'' असेही ते म्हणाले.
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com