एकनाथ खडसे, रोहिणी खडसेंना ट्विटरवरून शिवीगाळ

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, तसेच त्यांची कन्या व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांना ट्विटर अकाउंटवरून एका यूजरने अश्लील भाषेचा वापर करून शिवीगाळ केली. या प्रकरणी एकाविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

जळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, (NCP leader Eknath Khadse & Daughter Rohini Khadse) आणि त्यांची कन्या व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांना ट्विटर अकाउंटवरून एका यूजरने अश्लील (One user criticise with using improper language on Tweeter) भाषेचा वापर करून शिवीगाळ केली. या प्रकरणी एकाविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात (Crime register in cyber crime cell) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. खडसे यांनी भाजपतर्फे सुरू करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण आंदेालनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. २४) अकराच्या सुमारास त्यांच्या वैयक्तिक खात्यावरून ट्विट केले होते. भाजपला ओबीसींचा कधीपासून पुळका आला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? आता गळा काढण्यात काय अर्थ... अशा आशयाचे ट्विट करून भाजपला लक्ष्य केले होते.

या ट्वीटवर सपोर्ट यूथ (support youth@nagma216) या अकाउंटवरून महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि ॲड. रोहिणी खडसे यांच्याविषयी अक्षेपार्ह शिवराळ भाषेचा वापर करून टीका करण्यात आली होती. या प्रकरणी शनिवारी नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुहास चौधरी, सुशील शिंदे, अमित वाणी यांनी सायबर पोलिस ठाण्यात कारवाईचे निवेदन दिले. सायबर पोलिसांनी तत्काळ याची दखल घेत अशोक लाडवंजारी यांच्या तक्रारीवरून अक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या संबंधित ट्विटर अकाउंटचालकाविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक बळिराम हिरे तपास करीत आहेत.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com