मी एका पराभवाने खचणारा शिवसैनिक नाही - I will not discouraged by one defeat, Nashik politics | Politics Marathi News - Sarkarnama

मी एका पराभवाने खचणारा शिवसैनिक नाही

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 जुलै 2021

एका पराभवाने खचणारा शिवसैनिक अनिल कदम नसून, निफाड तालुक्यात शिवसेना बळकट आहेच. तरीही ती अधिक सक्षम करून संपर्क अभियानाच्या माध्यमातून ‘गाव तिथे शाखा’ आणि ‘घर तिथे शिवसैनिक’ करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन माजी आमदार अनिल कदम यांनी केले. 

चांदोरी : एका पराभवाने खचणारा शिवसैनिक अनिल कदम (I will not discouraged by one defeat) नसून, निफाड तालुक्यात शिवसेना बळकट आहेच. (Shivsena is still strong) तरीही ती अधिक सक्षम करून संपर्क अभियानाच्या माध्यमातून ‘गाव तिथे शाखा’ आणि ‘घर तिथे शिवसैनिक’ करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन माजी आमदार अनिल कदम (Anil kadam) यांनी केले. 

कदम म्हणाले, की आघाडी किंवा युतीचा विचार करू नका. सत्ता येते आणि जाते. पक्ष मजबूत करण्यासाठी सत्तेचा उपयोग करा, असा संदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ताकदीने सामोरे जाण्यासाठी शिवसेनेने १२ ते २४ जुलैदरम्यान शिवसंपर्क मोहीम हाती घेतली आहे. 

दरम्यान, ओझर येथील संपर्क कार्यालयाजवळ मेळावा होणार आहे.  यात आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आशासेविकांचा सत्कार होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर रविवारी चांदोरी येथे मेळावा झाला. राज्य सरकारचे जनहिताचे निर्णय घरोघरी पोचवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी ताकदीने कामाला लागायचे आहे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. यावेळी अशपाक शेख, अनिल कुंदे, शरद खालकर यांनी मनोगत व्यक्त केले. 

सभापती सुलभा पवार, जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, तालुकाप्रमुख सुधीर कराड, युवासेना तालुकाप्रमुख आशिष शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पाटील, दत्ता गडाख, संदीप टर्ले, डॉ. प्रल्हाद डेर्ले, गोकुळ गिते, संजय दाते, ‘मविप्र’चे माजी संचालक दिलीप मोरे, चांदोरी शिवसेना शहरप्रमुख संदीप गडाख, प्रकाश महाले, राजेश पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. 
...
हेही वाचा....

कृषी मंत्री म्हणाले, `मी अनुभवल्या शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथा`

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख