कृषी मंत्री म्हणाले, ` मी अनुभवल्या शेतकऱ्यांच्या व्यथा, कथा` - I have experience farmers pain & sorrow, Nashik politics | Politics Marathi News - Sarkarnama

कृषी मंत्री म्हणाले, ` मी अनुभवल्या शेतकऱ्यांच्या व्यथा, कथा`

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 जुलै 2021

शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथांचा मी अनुभव घेतला आहे. शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने समृध्द करण्यासाठी राज्यशासनाने शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यावर भर दिला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल, असा विश्वास कृषी मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.
 

मालेगांव :शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथांचा मी अनुभव घेतला आहे. ( I have experience farmers pain) शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने समृध्द करण्यासाठी राज्यशासनाने शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन (Producer companies will made Farmers rich)  करण्यावर भर दिला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल, असा विश्वास कृषी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी व्यक्त केला.

शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात आयोजित आढावा सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव सादर करावेत. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ हा गट शेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांसह महिला शेतकऱ्यांना डोळ्यापुढे ठेवून देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी पुर्वतयारी करून शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात. 

ते म्हणाले, `मनरेगा` योजनेतंर्गत फळबाग लागवडीत राज्याने ३८ हजार हेक्टरचा उच्चांक गाठला आहे. यामध्ये भविष्यात निश्चित वाढ होईल. विकेल ते पिकेल ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची संकल्पना शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. गतवर्षी ५०० रोपवाटीकांचा लक्षांक पूर्ण करुन यंदा तो एक हजाराचा देण्यात आल्यामुळे बळीराजाला यातून नक्कीच दिलासा मिळेल. द्रवरुपात उपलब्ध झालेला नॅनो युरियामुळे खतांचा अनावश्यक वापर टाळण्यास मदत होणार आहे. 

डाळींब बदलणार अर्थशास्त्र  
डाळींब हे शेतीचे अर्थशास्त्र बदलविणारे पिक आहे, असे श्री.नायकवडी यांनी सांगितले. ते म्हणाले, `मनरेगा` अंतर्गत फळपिक लागवडीत राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असतांना तालुक्यातून मिळणार अल्प प्रतिसाद आत्मचिंतन करणारा आहे. तालुक्यातील जवळपास ८४ हजार कुटूंब मनरेगातंर्गत फळबाग लागवडीसाठी पात्र आहेत. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन त्यांना प्रवाहात आणण्याचे काम करावे. स्पर्धेचे निकष शिथील करण्यात आले असून खरीप हंगामातील ११ पिकांचा पिकस्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. राज्यभरात सुमारे १५ हजार शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले असून, ठिबक सिंचन योजनेतही चांगले काम झाले आहे.

यावेळी रफीक नायकवडी, सुधाकर बोराळे, डॉ. प्रकाश पवार, कृषी अधिक्षक  विवेक सोनवणे, विभागीय कृषी अधिक्षक सुनिल वानखेडे, `आत्मा`चे प्रकल्प संचालक रविंद्र निकम, सरपंच चैत्राम पवार, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, प्राचार्य डॉ.विश्वनाथ‍ शिंदे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे आदी उपस्थित होते. 
...
हेही वाचा...

भुजबळ म्हणाले, `पाणीटंचाई नको असेल तर भाजपने पाऊस आणावा`

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख