येवल्यात आता उच्चदर्जाची आरोग्यसेवा

शहरात अद्ययावत रुग्णालयाची मागणी होती, त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयाचा विकास करण्यात आला आहे. तेथे ऑक्सिजनसाठी कायमस्वरूपी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. भविष्यात या रुग्णालयात उत्तम वैद्यकीय सुविधा मिळतील, असा विश्वास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
Bhujbal Chhagan
Bhujbal Chhagan

येवला : शहरात अद्ययावत रुग्णालयाची मागणी होती, (deemand of Advance Hospital in yeola) त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयाचा विकास करण्यात आला आहे. (Now Sub District grade alloted to yeola hospital) तेथे ऑक्सिजनसाठी कायमस्वरूपी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. (Permanant Oxygen facility available) भविष्यात या रुग्णालयात उत्तम वैद्यकीय सुविधा मिळतील, असा विश्वास पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केला. 

श्री. भुजबळ यांच्या हस्ते आज शहरात देवीमंदिर ते नागड दरवाजापर्यंत रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, नगरसेवक निसार शेख, मुश्ताक शेख, अमजद शेख, मलिक शेख, रईसा शेख, तहसीर शेख, राजेंद्र लोणारी, दीपक लोणारी, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, राधाकिसन सोनवणे, बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, अरुण थोरात, सचिन कळमकर आदी उपस्थित होते. 

श्री. भुजबळ म्हणाले, गेले दोन वर्षे कोरोनामुळे विकासकामांना उशीर झाला असला तरी विकासकामांचा हा बॅकलॉग भरून काढण्यात येईल. विकासाची कामे शहरात विविध होत आहे, यापुढेही होतील मात्र हे करत असताना शहर स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा. त्यातूनच रोगावर नियंत्रण मिळणे शक्य होणार आहे. कोरोना अद्यापही संपलेला नाही, त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही. जिल्ह्यात ऑक्सिजनसाठा करण्यासाठी टाक्या बसविण्यात आलेल्या आहे. ऑक्सिजन जनरेशन प्लँट देखील विकसित करण्यात आलेले आहे. जिल्हाभरात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही अशीही व्यवसथा केल्याचे ते म्हणाले. 

त्यांना कामधंदा नाही.. 
आमच्याविरुद्ध तक्रार करा, आम्ही जर बेकायदेशीर राहत असतो तर आम्हाला घराबाहेर काढलं असतं. निवडणुका आल्या की ज्यांना काही कामधंदा नाही ते खोटं नाट बोलून ब्लॅकमेलिंगचा धंदा करतात असे स्पष्ट करत सध्या चौकशी सुरू आहे, चौकशीला आम्ही उत्तरे देत आहोत अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी माजी खासदार किरीट सोमैय्या यांचे नाव न घेता दिली. 
...

हेही वाचा....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com