जयकुमार रावल यांच्या नियुक्तीने गिरीश महाजन गट नाराज?

मागील आठवड्यात भाजपमधील काही नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. ल्यानंतर काल पुन्हा काही नगरसेवकांनी मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कपाळावर आठया उमटल्या आहेत. नगरसेवकांच्या या मुंबई दौऱ्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
rawal- Mahajan
rawal- Mahajan

नाशिक : मागील आठवड्यात भाजपमधील काही नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Corporators meet Chandrakant Patil in last week) यांची भेट घेतली होती. ल्यानंतर काल पुन्हा काही नगरसेवकांनी मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (They meet Devendra Fadanvis also) यांची भेट घेतल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कपाळावर आठया उमटल्या आहेत. नगरसेवकांच्या या मुंबई दौऱ्याने  भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. 

दरम्यान या नगरसेवकांनी मात्र आम्ही विविध कार्यक्रमांच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने ही भेट घेतल्याचे सांगितले. असे असले तरी जयकुमार रावल यांच्याकडे नाशिकची सूत्रे दिल्यानंतर एक गट अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे या भेटीतून गिरीश महाजन समर्थकांचा गट सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.

मागील आठवड्यात भाजपच्या काही नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी पुणे येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर नाशिकमध्ये सर्वाधिकार प्रभारी जयकुमार रावल यांच्याकडे देण्याचे निश्चित झाल्याने भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर चार दिवस भाजपमध्ये शांत होते. मात्र, आज काही नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत विविध कार्यक्रमांचे निमंत्रण दिले.

आगामी काळामध्ये सातपूरमध्ये एका शाळेचे उद्‌घाटन, तसेच शहरामध्ये विविध विकासकामांचे उद्‌घाटन घेण्याचे निमंत्रण देण्यात आले. त्या अनुषंगाने श्री. फडणवीस ये हे पुढच्या आठवड्यात नाशिक मध्ये भेट देण्याची शक्यता आहे. परंतु, या भेटीच्या निमित्ताने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. आज स्थायी समितीचे सभापती गणेश गीते, माजी स्थायी समितीचे सभापती हिमगौरी आडके, माजी सभागृहनेते दिनकर पाटील , विद्यमान सभागृहनेते कमलेश बोडके व नगरसेवक मुकेश शहाणे यांनी भेट घेतली. या भेटीमध्ये शहरामध्ये विविध विकासकामांचे उद्‌घाटन करण्यासंदर्भात, तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीतीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या चर्चेत मागे भाजपमधील अंतर्गत वाद कारणीभूत असल्याचेदेखील एक चर्चेचा सूर आहे.
... 
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in