आता माघार नाही, काँग्रेस स्वबळावरच लढणार!  - Congress will contest elections on its own Nana Patole | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

आता माघार नाही, काँग्रेस स्वबळावरच लढणार! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 जून 2021

भाजप जनतेवर अन्याय करीत आहे त्याविरोधात लढा देणे हे प्रमुख कर्त्यव्य आहे

जळगाव : "काँगेस स्वबळावर निवडणुका लढणार असा संदेश दिला असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत, आता त्यापासून माघारी फिरण्याचे काही कारण नाही. निवडणुकीला तीन वर्षे बाकी आहेत, भाजप जनतेवर अन्याय करीत आहे त्याविरोधात लढा देणे हे आपले प्रमुख कर्त्यव्य आहे," असे मत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांनी आज व्यक्त केले.  Congress will contest elections on its own Nana Patole

नाना पटोले आजपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज फैजपूर येथे केंद्राने मंजूर केलेल्या कृषी विषयक कायद्याचे दहन करण्यात आले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, आमदार शिरीष चौधरी, आमदार कुणाल पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, जिल्हा अध्यक्ष अँड. संदीप पाटील आदी उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले की,  केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्यावर अत्याचार सुरू केले आहेत. इंग्रज सरकार पेक्षाही भयावह जुलूम केंद्रातले मोदी सरकार करीत आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहे, त्यांच्या सोबत बोलणी करण्यास या सरकारला वेळ नाही, महागाई वाढली आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त झाले.त्यामुळे आता जनतेच्या मनात आग धुमसत आहे, ती बाहेर पडली तर केंद्रातील सरकार भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही.2024 च्य निवडणुकीत जनता भाजप सरकारला निश्चित खाली खेचेल 
  
"स्वबळावर लढण्याच्या घोषणे बाबत ते म्हणाले, आगामी निवडणुका काँगेस स्वबळावर लढणार असा संदेश आपण दिला आहे. कार्यकर्तेही कामाला लागले आहेत.आपण स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे, आता त्यापासून माघार घेण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र अद्याप निवडणुकीला तीन वर्षे बाकी आहेत. आमचा प्रमुख अजेंडा भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारच्या अंन्यायला विरोध करणे हा आहे.आणि काँग्रेस पक्षाचे कार्यक्रते आता कामाला लागले आहेत," असे नाना पटोले म्हणाले. 

हेही वाचा :  ओबीसी आरक्षण रद्द होण्यास राज्य शासनच जबाबदार
 
नाशिक : देशातील इतर राज्यांमध्ये इतर मागासवर्गीयांचे आरक्षण सुरू असताना, राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे आरक्षण रद्द  झाल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश सरचिटणीस तथा आमदार प्रा. देवयानी फरांदे  यांनी केला. त्या म्हणाल्या, आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ न देण्याचा इशारा त्यांनी दिला. ओबीसी आरक्षण पूर्ववत व्हावे, यासाठी समता परिषदेच्या आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात २६ जूनला मंडल स्तरापर्यंत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख