Vasanti sor
Vasanti sor

ज्येष्ठ गांधीवादी नेत्या प्रा. वासंती सोर यांचे निधन

ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. वासंती सोर यांचे आज निधन झाले. त्याबद्दल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला आहे.

 
नाशिक : ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. वासंती सोर (Gandhian leader, Author & Educationist Prof Vasanti Sor passes away) यांचे आज निधन झाले. त्याबद्दल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal send condolence) यांनी शोक व्यक्त केला आहे.  

सोर यांच्या निधनाने सर्वोदय चळवळीचा आधारस्तंभ हरपला असल्याच्या शोकभावना श्री. भुजबळ यांनी व्यक्त केल्या. आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, प्रा. सोर या महात्मा गांधींजींनी स्थापन केलेल्या आणि आचार्य विनोबाजी भावे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या वर्धा येथील महिलाश्रमात लहानाच्या मोठ्या झाल्या. विनोबाजींच्या सानिध्यात शिकण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. त्याच ठिकाणी त्यांनी ६ वर्षे अध्यापनाचेही काम केले. विनोबाजींच्या भूदान पदयात्रेत काही काळ त्यांच्या सहभाग होता. 

महात्मा गांधीजींच्या मांडीवर बसण्याचे भाग्य लाभल्याचे त्या अभिमानाने सांगत. जन्मापासून अंगाला खादी शिवाय दुसऱ्या वस्त्राचा स्पर्श ही न झाल्याचा उल्लेख ही त्या नेहमी करत. आयुष्यभर स्वतः काताई केलेल्या खादीचे वस्त्र आणि कपडे वापरण्याचे व्रत त्यांनी जपले होते.

लौकिक अर्थाने त्या एम. ए. (हिंदी) एम. एड. झाल्या. नाशिकच्या बी एड कॉलेजमध्ये अनेक वर्ष अध्यापनाचे काम त्यांनी केले. त्याच कॉलेजच्या प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर त्या पूर्णपणे सामाजिक जीवनात कार्यरत झाल्या. गांधी विचारांची अभ्यासपूर्ण मांडणी ही त्यांची विशेषता होती. नाशिकच्या जीवन उत्सव या पर्यावरणीय जीवन शैली व गांधी विचारावर काम करणाऱ्या उपक्रमाच्या त्या आधारस्तंभ होत्या. 

प्रा. सोर स्वतःचा जीवन प्रवास समस्यामय असूनही त्यांनी कधी ही त्याचे प्रदर्शन, तर केले नाहीच पण सर्व समस्यांना खंबीरपणे तोंड देऊन त्या स्वतः सदैव हसतमुख असत. त्यांच्या जाण्याने गांधी आणि सर्वोदय परिवाराची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. जीवन उत्सव परिवार पोरका झाला आहे.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com