केंद्राने ओबीसी आरक्षणावर  भूमिका न घेतल्यास आंदोलन  - Centre should take initiative on OBC Issue, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्राने ओबीसी आरक्षणावर  भूमिका न घेतल्यास आंदोलन 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 जुलै 2021

कॉंग्रेस सरकारने तयार केलेला इम्पेरिकल डाटा दडवून ठेवल्यामुळे सुप्रिम कोर्टात राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणावर योग्य भूमिका घेतली नाही तर देशभरात कॉंग्रेस तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला.

नाशिक : कॉंग्रेस सरकारने तयार केलेला इम्पेरिकल डाटा दडवून ठेवल्यामुळे सुप्रिम कोर्टात राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. (SC Suspend OBC reservation because Centre hide imperical deta) केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणावर योग्य भूमिका घेतली नाही (If centre doesn`t take proper decision on OBC congress will make agitation) तर देशभरात कॉंग्रेस तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी (Bhanudas Mali) यांनी दिला. 

प्रदेशाध्यक्ष माळी यांचा उत्तर महाराष्ट्र दौऱ्यांतंर्गत शहर आणि जिल्हा कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाची बैठक शहर कॉंग्रेस कार्यालयात झाली,त्याप्रसंगी ते बोलत होते. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, प्रदेश उपाध्यक्ष विजय राऊत, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हनीफ बशीर, अनिल कोठुळे, उद्योग आघाडीचे रमेश पवार, संतोष रसाळकर, भगवान कोळेकर, ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते. 

श्री. माळी यांनी भाजप फक्त ओबीसी मतांवर डोळा ठेऊन असल्याचे सांगितले. ओबीसी आरक्षणावर आंदोलन करून नौटंकी करत आहे, पण ओबीसींचे आरक्षण टिकवण्यासाठी देशाचे पंतप्रधानांकडे मागणी करण्याची हिंमत करत नसल्याकडे लक्ष वेधले. त्यामुळे ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी यापुढील काळात कॉंग्रेसच्या मागे उभे राहावे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे या पुढे कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नसल्याचे मत व्यक्त केले. 

प्रदेश उपाध्यक्ष विजय राऊत यांनी प्रास्ताविकात आघाडीमुळे पक्षाच्या उमेदवारावर अन्याय होतो, त्यामुळे निवडणूक स्वबळावर लढली पाहिजे, पक्षांत जबाबदारी देतांना पक्षातंर्गत सोशल इंजिनिअरिंग करण्याचे आवाहन केले. 

भगवान कोळेकर,संतोष रासाळकर ,शहराध्यक्ष शरद आहेर,चंद्रकांत निर्वाण यांनी मत व्यक्त केले. बैठकीला उत्तमराव बडदे ,अशोक लहामगे,भगवान आहेर, प्रभाकर क्षिरसागर, चारुशीलाताई काळे, बबलू खैरे, उद्धव पवार, लक्ष्मण धोत्रे, संतू पाटील जायभावे, शांताराम लाठर, मयूर वांद्रे, यशवंत खैरनार, नंदकुमार येवलेकर, प्रवीण जेजुरकर, महेश गायकवाड, भास्कर जेजुरकर, अनिल कोठुळे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. 
... 
हेही वाचा...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात याचिका

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख