कोरोनामुळे पालक गमावलेल्या २४ बालकांना आर्थिक मदत - financial aid for 24 childrens; Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

कोरोनामुळे पालक गमावलेल्या २४ बालकांना आर्थिक मदत

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 जुलै 2021

कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या २४ बालकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत आज झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आले. बालकांच्या संगोपनासाठी तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. 
 

नाशिक : कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू (Both Guardian lost due to corona) झालेल्या २४ बालकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत आज झालेल्या (24 childrens sanction financial aid) बैठकीत मंजूर करण्यात आले. बालकांच्या संगोपनासाठी तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhre) यांनी दिल्या आहेत. 

आज जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी ते म्हणाले की, कोरोना काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे सर्वेक्षण करतांना ज्या बालकांचा सांभाळ त्यांचे नातेवाईक करत असतील त्यांच्या एकूण आर्थिक परिस्थितीचा देखील विचार करण्यात यावा. याअंतर्गत अनाथ झालेल्या बालकांचा सांभाळ करणाऱ्या ज्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती बेताची असेल, अशा बालकांना स्वयंसेवी संस्थांच्या बालकाश्रमात ठेवण्यासाठी नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात यावे, जेणे करून संबंधित बालकांचा सर्वांगिण विकास होऊन त्यांचे पालन व्यवस्थितरित्या होण्यासाठी मदत होईल. तसेच जे नातेवाईक अथवा कुटूंबातील सदस्य बालकांचे संगोपन करण्यासाठी इच्छुक नाहीत अशा बालकांना देखील बालगृहात दाखल करण्यासाठी योग्यती कार्यवाही करण्यात यावी.

कोरोना प्रादुर्भावामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावल्याने जी बालके अनाथ झाली आहेत, अशा बालकांच्या पुनर्वसन व सर्वांगिण विकासासाठी संबंधित बालक व जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी यांच्या नावे सामायिक बँक खात्यावर एकरकमी पाच लाख रूपये मुदत ठेवीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याने जिल्हा माहिला व बाल विकास यंत्रणेने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक सर्व कार्यवाही करावी. याकरीता आरोग्य यंत्रणेचे सहकार्य घेण्यात यावे. त्याचप्रमाणे महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनांचा लाभ या बालकांना होण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना देखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. प्रशासनाकडून अशा सर्व बालकांचा शोध जरी घेतला जाणार असला तरी नागरिकांना देखील याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी तातडीने संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री मांढरे यांनी केले. 

जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेली एकूण ८६१ बालके आहेत. त्यापैकी शून्य ते १८ वयोगटातील २४ बालकांनी आपली दोन्ही पालक गमावले आहेत. वयोगटातील ७७८ बालकांनी एक पालक गमावले आहे. त्याचप्रमाणे १९ ते २३ वर्षे वयोगटातील ९ बालकांनी दोन्ही पालक तर याच वयोगटातील ५० बालकांनी आपले एक पालक गमावले आहेत. यातील ३९६ बालकांना बाल संगोपन योजनांचा लाभ मंजुर करण्यात आला आहे. वारस नोंदणी व शिधापत्रिकांच्या लाभासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील यांनी बैठकीत सादर केली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, विधी व सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश प्रसाद कुलकर्णी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. के. आर. श्रीवास, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा शुभांगी बेळगांवकर, जिल्हा बाल संरक्षण समितीचे समन्वयक गणेश कानवडे, परिविक्षा अधिकारी योगीराज जाधव आदी उपस्थित होते.
...
हेही वाचा...

गोदावरी आणि ब्रम्हगिरीच्या संरक्षणासाठी अजिबात तडजोड नाही

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख