गोदावरी अन्‌ ब्रह्मगिरीच्या संरक्षणासाठी अजिबात तडजोड नाही

गोदावरीचा उगम म्हणून ब्रह्मगिरीला वाचवायला हवे, अशी पर्यावरण रक्षणाविषयीची भूमिका आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी स्पष्ट केली. त्याचक्षणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी गोदावरी आणि ब्रह्मगिरीबद्दल कसलीही तडजोड होणार नाही.
Suraj Mandhare
Suraj Mandhare

नाशिक : गोदावरीचा उगम म्हणून ब्रह्मगिरीला वाचवायला हवे, (Bramhgiri Mountain is source of Godavari river) अशी पर्यावरण रक्षणाविषयीची भूमिका आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह (Rajendra Singh) यांनी स्पष्ट केली. त्याचक्षणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी गोदावरी आणि ब्रह्मगिरीबद्दल कसलीही तडजोड होणार नाही, (No compramise on this issue) असे स्पष्ट केले.

गोदावरी गीत लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. इस्पॅलिअर इंटरनॅशनल स्कूलमध्ये पर्यावरणप्रेमींच्या उपस्थितीत ही बैठक झाली. ब्रह्मगिरीच्या उत्खननाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते. गोपाळ पाटील, लक्ष्मण सावजी, सत्यनारायण बोलीशेट्टी, विनोद बोधनकर, नरेंद्र चूब, सचिन जोशी, चैतन्य उदगीरकर, किरण भालेराव आदी उपस्थित होते. पर्यावरणप्रेमींच्या ब्रह्मगिरीबद्दल भावना तीव्र आहेत, ही बाब निदर्शनास आणून देत डॉ. सिंह यांनी नाशिकची ओळख असलेल्या बाबींबद्दल आदर करणे, सांभाळून ठेवणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. त्याबद्दल ब्रह्मगिरीच्या नुकसानीबद्दल प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या दंडाकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.

पर्यावरण आणि विकासाचा समतोल राखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सची माहिती देऊन श्री. मांढरे म्हणाले, की टास्क फोर्समध्ये पर्यावरणप्रेमी, अधिकारी, बांधकाम आणि क्रशर व्यावसायिकांचा समावेश करण्यात आला आहे. नाशिकबद्दल मला काळजी असल्याने पर्यावरणीय, नैसर्गिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक महत्त्व नसलेल्या ठिकाणी काम करायला हरकत असण्याचे कारण नाही. त्यासाठी तीनस्तराचा विचार होईल.

ते पुढे म्हणाले, पहिला भाग म्हणजे, कोणी कशालाही हात लावू शकणार नाही. दुसरा भाग म्हणजे, नियंत्रण ठेवणे आणि तिसरा भाग म्हणजे, हानी न होणाऱ्या ठिकाणी विकासकांना मान्यता द्यावी लागेल. प्रत्येक जण बंद म्हणत राहिल्यास, पर्याय द्यावा लागेल. भविष्याला धक्का लागणार नाही अशा ठिकाणी काम करायला हरकत घेण्याचे कारण नाही.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com