दादा भुसे म्हणाले, टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाजूला काढा  

मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम सध्याच्या राज्य सरकारने अधिक नेटाने केले आहे. त्याबाबत सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध स्तरावर समन्वय केला. याउलट विरोधी पक्ष यावर फक्त राजकारण करीत आहे.
Dada Bhuse
Dada Bhuse

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम सध्याच्या राज्य सरकारने अधिक नेटाने केले आहे. (State Government given reservation to Maratha community) त्याबाबत सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध स्तरावर समन्वय केला. याउलट विरोधी पक्ष यावर फक्त राजकारण करीत आहे. (Opposition parties doing politics only) त्यामुळे मराठा समाज अडडचणीत असताना त्यांना आरक्षणाची गरज असताना त्यात राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. समाज ते काम करेन, असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे (Agrculture minister Dada Bhuse) यांनी व्यक्त केला. 

मराठा क्रांती मोर्चातर्फे नाशिक येथे काल मुक आंदोलन झाले. यावेळी लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला असा हॅशटॅग होता. यावेळी श्री. भुसे यांनी आंदोलनात भाग घेऊन पाठींबा व्यक्त केला. 

कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. भावी  पिढीसाठी ते आरक्षण गरजेचे आहे. पक्षाचे राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन मार्गक्रमण करावे लागेल. शासन पातळीवर जी जबाबदारीत्री  घ्यायची असेल, ती मी घेईन. केंद्र सरकारपर्यंत भूमिका पोचवेन. आंदोलनाची वेळ येणार नाही. 

ते म्हणाले, इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळाले पाहिजे, हीदेखील मराठा समाजाची भावना आहे. आरक्षणाची मागणी फक्त मराठा समाजाची नाही, इतर समाजाचीदेखील मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका आहे, त्यासाठी दिल्लीवर कूच करण्यासाठी नाशिक जिल्हा आघाडीवर राहील. राजकारण करणारे अनेक जण आहेत, टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना खासदार संभाजीराजे यांनी बाजूला करावे. संभाजीराजेंनी इतर समाजाचे प्रश्नही सोडविण्याची भूमिका घ्यावी, कारण मराठा समाज हा मोठा भाऊ आहे.
... 

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com