आपण एकत्र येऊन लढायला हवं; छगन भुजबळांचं संभाजीराजेंना आवाहन

नाशिकमध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन सुरू आहे.
Chhagan Bhujbal appealed to SambhajiRaje to come together for reservation
Chhagan Bhujbal appealed to SambhajiRaje to come together for reservation

नाशिक : मराठा आरक्षण (Maratha Reservation) कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर मराठा समाजानं राज्यात पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्याची सुरूवात कोल्हापूरातून नुकतीच झाली. आज नाशिकमध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आपली भूमिका मांडताना संभाजीराजे यांना आरक्षणासाठी एकत्रित येऊन लढा देण्याचं आवाहन केलं. (Chhagan Bhujbal appealed to SambhajiRaje to come together for reservation)

मराठा आणि ओबीसी समाजात वितुष्ट नको, असे सांगत भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यात कुणाचं दुमत नाही. राष्ट्रवादीसह सर्व पक्षांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. माझ्या पक्षाच्या भूमिकेशी मी एकनिष्ठ आहे. ओबीसी समाजाचे आरक्षणही  सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आहे. मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण गरजेचे आहे. शाहू-फुले-आंबेडकर हे आमचे आदर्श आहे. आपले उद्दिष्टे एकसमान आहे. त्यामुळं आपण एकत्र येऊन लढायला हवं, असं आवाहन भुजबळ यांनी केलं.

केंद्राने आकडेवारी दिली तर हे प्रश्न निर्माण होणार नाहीत. सामाजिक तेढ निर्माण होणार नाही. मी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मी फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा पाईक आहे. मी कधी आरक्षणाला विरोध केला नाही. मला मात्र काहींनी कायम आरक्षण विरोधी आहे, अशी प्रतिमा तयार केली. संभाजीराजेंनी सगळ्यांना एकत्र घेण्याची भूमिका घेतली आहे. चर्चेशिवाय मार्ग निघणार नाही. त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे, असं आश्वासनही भुजबळ यांनी यावेळी दिलं. 

ओबीसी मोर्चे मराठा विरोधी नाहीत

इतर आरक्षणांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, अशी सर्वच पक्षांची भूमिका आहे. पण आरक्षण मिळण्यात अडचणी आहेत. ओबीसी आक्रोश मोर्चे मराठा समाजाला अडचणी आणण्यासाठी काढले जात असल्याचे काही जण सांगतात. पण असे काही नसून मराठा व ओबीसी दोन्ही समाज अडचणीत आहेत, असे भुजबळ यांनी स्पष्ट केलं. 

आमदार सरोज अहिरे यांनी मराठा समाजातील आरक्षण प्रश्नावर मी समाजसोबर राहीन माझ्या परीने पूर्ण प्रयनशील राहीन, असं आश्वासन दिलं. ज्या ज्या वेळी संभाजीराजे सांगतील त्यावेळी मी सोबतच राहीन. मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करेन. विधानसभेत आणि बाहेरही सोबतच राहीन, असे आमदार सुहास कांदे यांनी सांगितलं. सर्व आदिवासी आमदार मराठा समाजासोबत असल्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com