सहकारमंत्र्यांनी सदाभाऊ खोतांना दाद दिली नाही! - Cooperative minister Doesnot entertain Sadabhau Khot, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

सहकारमंत्र्यांनी सदाभाऊ खोतांना दाद दिली नाही!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 जून 2021

येथील जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा या मागणीसाठी आज भाजप व रयत क्रांती संघटनेतर्फे आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलन केले. यावेळी सहकारमंत्र्यांनी याबाबत आमदार खोत यांच्या मागण्यांवर यापूर्वीच निर्णय झाला असल्याने दाद दिली नाही.

नाशिक : येथील जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा या मागणीसाठी (Crop loan should disburse to farmers) आज भाजप व रयत क्रांती संघटनेतर्फे आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आंदोलन केले. यावेळी सहकारमंत्र्यांनी याबाबत आमदार खोत यांच्या मागण्यांवर यापूर्वीच निर्णय झाला (Cooperative minister said decision had taken already) असल्याने दाद दिली नाही. त्यामुळे खोत चांगलेच नाराज झाले. ते म्हणाले, त्यांना सत्तेची धुंदी आली आहे. आम्ही त्यांच्या घरापुढे आंदोलन करू.

जिल्ह्यात गेल्या चार वर्षापासुन नैसर्गिक संकटामुळे  शेतकरी अडचणीत सापडला आहे.कर्जमुक्ती योजनेत पात्र शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध होत नाही. "शेतकऱ्यांना त्वरित पिककर्ज उपलब्ध झाले पाहीजे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव थांबवा" या मागणीसाठी रयत क्रांती संघटना व भाजप किसान मोर्चा यांच्याकडून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर धरणे आंदोलन करत राज्यसरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

याकडे लक्ष घालण्याची विनंती केली. जिल्हा बँकेकडून होणारे लिलाव थांबवा,खातेदारांच्या बचत खात्यातून कर्ज खात्यात पैसे वर्ग करण्यासाठी बँकेला सूचना करा,अशी मागणी खोत यांनी केली. 

सकाळी अकराला आंदोलनाला सुरुवात झाली."रद्द करा रद्द करा जमिनीचे लिलाव रद्द करा","त्वरित पीककर्ज मिळाले पाहिजे","व्याजात सवलत मिळाली पाहिजे","कृषी मंत्री जागे व्हा" अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी खोत म्हणाले, शेतकऱ्यांच्या जमीनींचा लिलाव जिल्हा बँकेकडून केला जात आहे. कृषिमंत्र्यांनी त्यात लक्ष घालून हे लिलाव थांबवले पाहिजे. शेतकरीहिताच्या घोषणा करायच्या, अन् फसवायच असे काम सुरू आहे. राज्यात पीककर्ज लक्ष्यांक जाहीर केला असताना शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. एकीकडे बियाण्यांची दर वाढले. यातून कोट्यवधी रुपये उकळले जात आहे. हे सरकार किती गोष्टीत पैसे खाणार, अशी टीका त्यांनी केली.

ते म्हणाले, शेतकरी प्रश्न मांडून आक्रोश करत असताना शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचे काम सुरू आहे, असा आरोप आमदार फरांदे यांनी केला. बिगर कृषी कर्जाची वसुसी का होत नाही?. मग शेतकऱ्यांचीच वसुली का? असा सवाल खासदार पवार यांनी उपस्थित केला. 

बँकेकडे ठेवी असताना लेकीबाळीचे लग्न व कोरोनासारख्या महामारीत उपचाराकरता बँक पैसे देत नाही ही बँकेची मुजोरी आहे; जर बँकेने असे केल्यास बँकेच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना फिरू देणार नाही,असा इशारा यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिला. 
सहकारमंत्र्यांना फोन केला

आंदोलन सुरू झाल्यानंतर बँकेचे मुख्य प्रशासक आरिफ, मुख्य कार्यकारी अधिकारीशैलेश पिंगळे हे आंदोलनस्थळी आले. यावेळी त्यांना घेराव घालण्यात आला. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर बचत व ठेवी आहेत, अशा खातेदारांच्या रकमा दुसऱ्याच्या कर्ज खात्यावर वर्ग करण्यासाठी ते तयार आहेत. मात्र बँकेला यात अडचण का असा सवाल उपस्थित करण्यात आला. 

या आंदोलनात खासदार डॉ. भारती पवार, आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, रयत क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, जिल्हाध्यक्ष वाल्मिक सांगळे, किसान मोर्चाचे शहराध्यक्ष हेमंत पिंगळे, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, बापू पाटील, नितीन गायकर आदी उपस्थित होते.
.,,
हेही वाचा...

आयाराम गयाराम...दहा वर्षात एकाही नेत्यावर पक्षांतराची कारवाई नाही

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख