आगामी विधानसभेसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असून, त्यासाठी काँग्रेसची शक्तिस्थळे मजबूत करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले.
Nana Patole
Nana Patole

नाशिक  राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार (Congress will face upcoming Assembly Election Alone) असून, त्यासाठी काँग्रेसची शक्तिस्थळे (Congress strongpoints) मजबूत करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (Maharashtra president Nana Patole) यांनी केले. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र शाखेची राज्यस्तरीय कार्यकारिणीची ऑनलाइन बैठक नुकतीच झाली. त्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ते म्हणाले, की केंद्र सरकारने कामगार कायदे मोडीत काढताना भांडवलदारधार्जिणी चार विधेयके तयार करून कामगार देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. कामगारविरोधी कायदे महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी काँग्रेसने स्वातंत्र्य काळापासून इंटकच्या सूचनेवरून अनेक कामगार हिताचे कायदे बनविले. परंतु, सध्या शेतकरी कामगारांच्या विरोधात केंद्र सरकार कायदे करीत आहे. या विरोधात काँग्रेस लढा देण्याचे काम करीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या समस्या, कामगारांची हालअपेष्टा, सरकारचे धोरण, काँग्रेसकडून इंटकला मिळणारी वागणूक तसेच शासनाच्या विविध मंडळ, महामंडळावर इंटकला प्रतिनिधित्व मिळावे यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

काँग्रेस व इंटक संघटनेमध्ये समन्वय वाढवून संबंध मजबूत करण्याचे आवाहन इंटकचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी आमदार पटोले यांना करताना काँग्रेस, इंटकची स्थापना व संबंध याची सविस्तर माहिती दिली. काँग्रेस हितासाठी इंटकला महत्त्व देण्याचे व विविध क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न करावेत तसेच इंटकच्या पदाधिकाऱ्यांना शासनाच्या विविध मंडळ, महामंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी पटोले यांच्याकडे केली. संघटनेचे सरचिटणीस गोविंद मोहिते, कार्याध्यक्ष कैलास कदम, महेंद्र घरत, दिवाकर दळवी, मुकेश तिगोटे, युवकाध्यक्ष दत्तात्रय गुट्टे आदी पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडली.

यावेळी निवृत्ती देसाई, रामभाऊ सातव, विनोद पटोले, प्रवीण वाजपेयी, प्रदीपकुमार वखारिया, भाग्यश्री भुरके, दादाराव डोंगरे, डॉ. संदीप वंजारी, डॉ. आर. पी. भटनागर, अर्चना बोंबले, हिंदुराव पाटील, सी. डी. नागदिवे, महेंद्र वाहने, इस्माईल पठाण, श्रीकांत सड्डू, वैभव पाटील, संगीता राउल, रेखा घरत, वैभव पाटील, रवींद्र सावंत, सचिन शिरसाट, उपेंद्र पाटील, सुरेश गुप्ता आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com