शिवसेनेच्या नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे कोरोनाने निधन

शिवसेनेच्या ज्येष्ठ व आक्रमक नेत्या, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख व महापालिका प्रभाग २२ च्या नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे काल रात्री कोरोनाने निधन झाले. कोरोनाने निधन झालेल्या शिवसेनेच्या त्या दुसऱ्या नगरसेविका आहे.
Satyabhama Gadekar
Satyabhama Gadekar

नाशिक : शिवसेनेच्या ज्येष्ठ (Shivsena senior Women leader)  व आक्रमक नेत्या, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख व महापालिका प्रभाग २२ च्या नगरसेविका सत्यभामा गाडेकर (Corporator Satyabhama Gadekar) यांचे काल रात्री कोरोनाने निधन (Died due to Covid) झाले. कोरोनाने निधन झालेल्या शिवसेनेच्या त्या दुसऱ्या नगरसेविका आहे.

सौ. सत्यभामा गाडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. गेल्या आठवड्यात त्यांना शहरातील सह्याद्री हॅास्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच रविवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहीत मुलगे आणि एक मुलगी आहे. 

सौ. गाडेकर या महापालिकेच्या १९९२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. त्या तीन वेळा नगरसेविका राहिल्या. शिवसेना महिला आघाडीच्या आक्रमक नेत्या म्हणून त्या परिचीत आहेत. महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली. सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क असल्याने त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे. यापूर्वी शिवसेनेच्या कल्पना पांडे या नगरसेविकेचे कोरोनाने निधन झाले होते.  

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजया रहाटकर यांनी विदर्भाच्या प्रश्नावर वेगळी भूमिका घेत महाराष्ट्राचे चार राज्यांत विभाजन करा असे वक्तव्य केले होते. त्यातून त्यांनी सहकारी पक्ष शिवसेनेला डिवचले होते. त्यावरून शिवसेना व भाजप  यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व भाजप नेत्या विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत नाशिकला झालेला भाजपचा महिलांचा मेळावा त्यांनी उधळून लावला होता. त्यामुळे त्या चर्चेत आल्या. यासंदर्भात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक देखील झाली होती.  
...
शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका असलेल्या सत्यभामा गाडेकर यांनी शिवसेना पक्षामध्ये विविध महत्वाची पदे भूषविली. त्या अतिशय लढवय्या नेत्या होत्या. नागरिकांच्या प्रश्नांवर अतिशय आक्रमकपणे भूमिका घेत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या नेहमी तत्पर असायच्या. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी तत्पर असलेलं एक लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाने गाडेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

-छगन भुजबळ, अन्न, नागरी पुरवठा मंत्री.
...
वर्षानुवर्ष बरोबर सामान्यांसाठी काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे अशाप्रकारे अचानकपणे आपल्यातून निघून जाणे हे मनाला वेदना देणारी व चटका लावणारी घटना आहे. गाडेकर यांचे जाणे ही कधीही न भरून निघणारी, अतीव  दुःख देणारी अशी घटना आहे.
-सतिश नाना कुलकर्णी, महापौर.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com