काँग्रेसची अवस्था चांगली नाही, मोठे बदल करावे लागतील

जिल्ह्यातील संघटन, गटबाजीबाबत गंभीर स्वरूपाची माहिती मिळाली आहे. अवस्था चांगली नाही. मोठे फेरबदल करावे लागतील. पक्षात गटबाजी असल्याच्या तक्रारी आहेत. गटबाजी खपवून घेणार नाही, या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दम भरला.
Nana Patole
Nana Patole

जळगाव : जिल्ह्यातील संघटन, गटबाजीबाबत गंभीर स्वरूपाची (Groupism in Congress is serious issue) माहिती मिळाली आहे. अवस्था चांगली नाही. मोठे फेरबदल करावे लागतील. (Have to made chnages at organisation lavle) पक्षात गटबाजी असल्याच्या तक्रारी आहेत. गटबाजी खपवून घेणार नाही, या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कार्यकर्त्यांना दम भरला.

जिल्ह्यात दौऱ्यावर आले असता, पटोलेंनी बुधवारी सायंकाळी काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. श्री. पटोले म्हणाले, की स्थानिक माध्यम प्रतिनिधींकडून संघटना, त्यातील गटबाजीबद्दल गंभीर स्वरूपाची माहिती मिळाली आहे. हे चित्र चांगले नाही. काही मतभेद असतील, तर वरिष्ठांसोबत चर्चा केली पाहिजे. संघटनेला हानी पोचेल, असे वर्तन करू नये. पुढच्या वेळी जिल्ह्यात येईन तेव्हा हे चित्र दिसायला नको, असेही पटोलेंनी बजावले.

ते म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था अपेक्षेप्रमाणे नाही. त्यामुळे संघटनात्मक बाबींच्या दृष्टीने आढावा घेतला असून, पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी कठोर व मोठे बदल करणे गरजेचे आहे, लवकरच त्याबाबत निर्णय घेऊ. 

श्री. पटोले यांना जिल्ह्यातील संघटनेबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले, की कोविडचा आढावा घेत असताना आम्ही संघटनात्मक बाबींचाही आढावा घेत आहोत. ज्या ठिकाणी संघटन कमकुवत असेल तिथे कठोर व मोठे निर्णय घ्यावे लागतील. जळगाव जिल्ह्यातही रिक्त पदे भरण्यासोबतच जिल्हा कार्यकारिणीत मोठे फेरबदल लवकरच करण्यात येतील.

महाजनांचा समाचार
जळगाव जिल्ह्यात, महापालिकेत काय सुरू आहे, असे माध्यम प्रतिनिधींना विचारत पटोलेंनी नाशिकला महापालिका रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे रुग्णांना प्राण गमवावे लागले. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे, तिथे पालकमंत्री कोण होते, नेतृत्व कुणाकडे होते हे सर्वांना माहीत आहे. भाजपशासित राज्यांपेक्षा महाराष्ट्र सरकारने कोरोना स्थिती चांगल्या प्रकार हाताळली, असा दावाही पटोलेंनी केला.
या वेळी प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com