शहर भाजपची टीम केंद्र सरकारच्या दरबारात 

महापालिका निवडणुका जवळ येत असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षात अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने टोक गाठले आहे. दुसरीकडे शहर विकासासाठी केंद्र सरकारकडे अडकून पडलेल्या प्रकल्पांचा पाठपुरावा करण्याबरोबरच आगामी निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी शहर भाजपची टीम रविवारी दिल्लीला रवाना होत आहे.
शहर भाजपची टीम केंद्र सरकारच्या दरबारात 
Satish kulkarni

नाशिक : महापालिका निवडणुका जवळ येत असताना (NMC elections is near about) सत्ताधारी भारतीय जनता पक्षात अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने टोक गाठले आहे. (There is a vast differences in party level) दुसरीकडे शहर विकासासाठी केंद्र सरकारकडे अडकून पडलेल्या प्रकल्पांचा पाठपुरावा (Otherside devolopment projects stuck at centre for clearence)  करण्याबरोबरच आगामी निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी शहर भाजपची टीम (City BJP team will move on sunday to visit delhi) रविवारी दिल्लीला रवाना होत आहे. 

महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागूल, स्थायी समिती सभापती, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, हिमगौरी आडके, माजी गटनेते जगदीश पाटील यांच्यासह महापालिकेचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, शहर अभियंता नितीन वंजारी, कार्यकारी अभियंता संजय घुगे यांचा टीममध्ये समावेश आहे. केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांची ते भेट घेणार आहेत. 

विकासकामे अन् वादावर चर्चा 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही दिल्लीत असून, पक्षांतर्गत कार्याचा आढावा घेत आहे. पुढील वर्षात महापालिकेच्या निवडणुका असल्याने केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी शहर भाजपच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. फडणवीस व पाटील साडेचार वर्षांतील कामकाजाचा आढावा घेण्याबरोबरच पक्षांतर्गत वादावर चर्चा करणार असल्याचे समजते, तर दोघांच्या मदतीने केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन शहर विकासासंदर्भातील अडचणींचा पाठपुरावा केला जाणार आहे. त्यासाठी पालिकेचे अधिकारी सोबत घेण्यात आले आहेत. 

या योजनांचा करणार पाठपुरावा 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात नमामि गंगा प्रकल्प राबविण्यात आला आहे. त्याच धर्तीवर दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरातून जाणाया गोदावरीचा विकास करण्यासाठी नमामि गोदा प्रकल्पाचे आश्‍वासन भाजपकडून देण्यात आले आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे पडून आहे.

या प्रकल्पासाठी निधी मिळावा म्हणून साकडे घातले जाणार आहे. नाशिक शहराची पाणीपुरवठा व्यवस्था भक्कम करण्यासाठी अमृत योजना दोनमध्ये २२६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु अमृत योजनेचा निधी संपुष्टात आल्याने योजना रखडली आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे निधी देण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
...
हेही वाचा...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in