कोरोनाशी झगडत विकासकामे सुर ठेवा!

कोरोनाचे संकट असल्याने विकास कामांवर काही मर्यादा येत होत्या. त्याचबरोबर अतिवृष्टीसह अनेक संकटे राज्यावर आली आहेत. या परिस्थितीतूनही मार्ग काढत शासनाच्या माध्यमातून विकास कामे करत आहोत.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : कोरोनाचे संकट असल्याने विकास कामांवर काही मर्यादा येत होत्या. (There are limitation on devolopment works in covid19 period) त्याचबरोबर अतिवृष्टीसह अनेक संकटे राज्यावर आली आहेत. (Crisis of  Flood & Heavy rainsin state) या परिस्थितीतूनही मार्ग काढत शासनाच्या माध्यमातून विकास कामे करत आहोत. (In this situation also devolopment is on) त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी विकास कामांमध्ये लक्ष घालून ही ती पूर्णत्वास आणावीत, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे.

येवला मतदारसंघांतर्गत निफाड तालुक्यातील ४२ गावांच्या परिसरात आज पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास, ठक्कर बाप्पा, समाज कल्याण, जिल्हा क्रीडा, ग्राम निधी, जिल्हा नियोजन, मुलभूत सुविधा, जनसुविधा, आमदार निधी, सार्वजनिक बांधकाम यासह विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे १०.२७ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, कोरोनाची अद्यापही तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनी अधिक काळजी घेऊन लसीकरण करून घ्यावे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऑक्सिजन जनरेशन प्लँटची निर्मिती करणे सुरू आहे. त्यामुळे जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण होत असून ऑक्सिजनची टंचाई निर्माण होणार नाही. कोरोनाच्या काळातही शेतकऱ्यांनी अविरतपणे काम करत अन्न, धान्याचा तुटवडा निर्माण होऊ दिला नाही. शेतकऱ्यांचे हे योगदान अतिशय महत्वाचे आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, कोरोनाच्या काळात राज्यात ५५ हजार रेशन दुकानदारांच्या माध्यमातून ८.५ लाख टनाहून अधिक अन्न धान्याचे वाटप करून राज्यातील जनतेला दिलासा देण्याचे काम करण्यात आले.

जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकासाची कामे ठप्प असतांना देखील येवला मतदारसंघात विकासाची कामे अविरत सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी योग्य नियोजन केल्याने नाशिक जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्र शासनाकडून विकासाची कामे जिल्ह्यात सुरू आहेत.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुंबई बाजार समितीचे संचालक, सरपंच जयदत्त होळकर, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, ब्राम्हगणगांव सरपंच प्र. वि. चौधरी, उन्मेश डुंबरे, अनुप वनसे, सरपंच दत्तात्रय डुकरे, भाऊसाहेब भवर, शिवाजी सुपनर, येवला पंचायत समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, नांदूशेठ डागा, ज्ञानेश्वर शेवाळे, मंगेश गवळी, पांडुरंग राऊत, बबन शिंदे, प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, उपभियंता ए. पी. गोसावी, गट विकास अधिकारी संदिप कराड, उपअभियंता आर. ए. फारुखी आदी उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com