भाजपच्या स्मिता पाटील यांनी बांधले शिवबंधन !

येथील अस्मिता फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा भाजपच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या राज्य समन्वयक प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले.
Smita patil jalgao
Smita patil jalgao

जळगाव : येथील अस्मिता फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा भाजपच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या राज्य समन्वयक प्रा. डॉ. अस्मिता पाटील (Asmita fdoundation`s state coordinator resigne BJp & Join shivsena) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री एकनाथ शिंदे (Minster Eknath Shinde) यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले. 

पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांच्या शिवालय या संपर्क कार्यालयात प्रवेश सोहळा झाला. प्रा डॉ. अस्मिता पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल त्यांचा मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांनी शिवबंधन बांधल्याचे जाहीर करण्यात आले. 

प्रा. डॉ. अस्मिता पाटील या प्रथम राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष होत्या. त्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपच्या प्रवक्त्या, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या राज्य समन्वयक या पदावर काम करण्याची संधी देण्यात आली. परंतु त्यांना पदानुसार योग्य तो न्याय न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्या भाजपपासून दुरावल्या होत्या. अखेर त्यांनी भाजपचा त्याग करत हाती शिवबंधन बांधले. त्यांच्यासोबत पाचोरा व भडगाव तालुक्यातील त्यांच्या सहकारी महिलांनीही शिवसेनेत प्रवेश केला. 

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, संपर्कमंत्री संजय सावंत, आमदार चिमणराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार किशोर पाटील, कन्नडचे आमदार उदेसिंग राजपूत, पाचोरा विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख सुनील पाटील, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, उद्धव मराठे, दीपकसिंग राजपूत, ॲड. दिनकर देवरे, नाना वाघ यांसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com