बच्चू कडू म्हणतात, राजकारणातील वाद कुठे खरे असतात? 

केवळ मीडियाला दाखविण्यापुरता महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये संर्घष सुरु असतो. वादाच्या चर्चा सगळ्या खोट्या आहेत. राजकीय नेत्यांमध्ये कोणते वाद खरे असतात का?. राज्यातील महाविकास आघाडीत देखील तसेच आहे. कुठलेही मतभेद नाहीत, असा दावा शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला.
Bacchu kadu
Bacchu kadu

नाशिक : केवळ मीडियाला दाखविण्यापुरता महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये संर्घष सुरु असतो. (Controversy between Leaders are for to show media) वादाच्या चर्चा सगळ्या खोट्या आहेत. (Disputes in political leaders are not not factual) राजकीय नेत्यांमध्ये कोणते वाद खरे असतात  का?. राज्यातील महाविकास आघाडीत देखील तसेच आहे.  कुठलेही मतभेद नाहीत, असा दावा शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला. 

राज्यमंत्री कडू आज सकाळी नाशिकच्या न्यायालयात सुनावणीसाठी हजर होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. अपंगाच्या योजनांच्या अंमलबजावणीतील दिरंगाईसह भरतीबाबतच्या वादातून २०१७ मध्ये नाशिक महापालिकेतील प्रहार संघटनेने आंदोलन केले होते. त्या खटल्यात न्यायलयात  हजर नसल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरट निघाले होते.  

ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्षात कुरुबूरी सुरु आहेत. कॉग्रेस पक्षाकडून स्वबळाची भाषा केली जाते. आघाडीतील घटक पक्षात कायमच कुरुबुर सुरु असते. गाठीभेटी, बैठकातून कायमच अस्वस्थतेचे वातावरण आहे, त्यामुळे राजकीय अस्वस्थता असल्याची कारणे विचारली असता, त्याचा त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. 

ते  म्हणाले की, महाविकास आघाडीतील नेत्यांमधील संघर्ष किंवा कुरुबुरीचे चित्र हा केवळ देखावा आहे. हा संघर्ष वरवर दाखविण्यापुरता आहे. त्यात कधी तत्थ्य असते का असा उलट प्रश्न त्यांनी केला. राज्यातील सरकार कोसळेल असे चित्र वारंवार निर्माण केले जात असले, तरीही प्रत्यक्षात हा सगळा देखावा आहे. महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. सरकार भक्कम आहे, असा दावा त्यांनी केला. 

महापालिकेतील गुन्हा 
महापालिकेत २०१७ मध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतर्फे आंदोलन झाले होते. अपंगासाठीच्या ३ टक्के निधी अपंगासाठी खर्च होत नसल्याच्या कारणावरून झालेल्या आंदोलनादरम्यान श्री. कडू यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. यात त्यांना अटक झाली होती. मात्र या दरम्यान, जामीनदाराचा मृत्यू झाला. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरट जारी केले होते. 

दरम्यान, पुढील सुनावणीला येताना जिल्ह्यातील अंपगाच्या प्रश्नाबाबत बैठक घेऊ. त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढला जाईल. त्याचवेळी खटल्याला हजर राहणार आहे, असे ते म्हणाले.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com