`भाजप`तर्फे महविकस आघाडी सरकारची जळगावला अंत्ययात्रा - BJP workers organise a Symbolic Funeral of State Government, Jalgaon Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

`भाजप`तर्फे महविकस आघाडी सरकारची जळगावला अंत्ययात्रा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 जुलै 2021

भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी असभ्य वर्तनाचा ठपका ठेवत निलंबित केले. त्यात जळगाव येथील भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांचा समावेश आहे. त्यामुळे जळगाव शहर भाजप कार्यकर्त्यानी महाविकास आघाडी सरकारची अंत्ययात्रा काढून निषेध केला.

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी असभ्य वर्तनाचा ठपका ठेवत निलंबित केले. (Assembly speaker suspend 12 BJP MLA) त्यात जळगाव येथील भाजप नेते आमदार गिरीश महाजन (That inclueds Jalgao Girish Mahajan) यांचा समावेश आहे. त्यामुळे जळगाव शहर भाजप कार्यकर्त्यानी महाविकास आघाडी सरकारची अंत्ययात्रा (BJP workers agitate with symbolic Funeral) काढून निषेध केला.

विधिमंडळात गदारोळ केल्याचा आरोप करीत भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. यात जळगावचे आमदार महाजन यांचाही समावेश आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांतर्फे जळगाव शहरात या कारवाईचा निषेध करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली महानगर विकास आघाडी सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी पोलिसांनी दहन करण्यात येणारा पुतळा ताब्यात घेतला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
...

हेही वाचा...

५० टक्क्यांची मर्यादा वाढविण्यासाठी विधानसभेत ठराव
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख