सत्ता भाजपची अन् भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा विसर! 

येथील नगरपालिकेत भाजपाची सत्ता असून नगराध्यक्ष भाजपाचे आहेत. असे असताना शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी फलकावर मतदारसंघाच्या खासदार व केंद्रीय आरोग्य राज्मंत्री डॉ. भारती पवार यांचे नामोल्लेख नसल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली.
Bharti Pawar BJP
Bharti Pawar BJP

येवला : येथील नगरपालिकेत भाजपाची सत्ता असून नगराध्यक्ष भाजपाचे आहेत. (BJP is in power in Yeola city corporation) असे असताना शहरातील विविध विकासकामांच्या (Various devolopment works hoardings) उद्घाटनप्रसंगी फलकावर मतदारसंघाच्या खासदार व केंद्रीय आरोग्य राज्मंत्री डॉ. भारती पवार (They forget to mention center minister Dr Bharti Pawar) यांचे नामोल्लेख नसल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली. (BJP workers Angry on this issue) त्यांचा नामोल्लेख हेतूपुरस्कर टाळण्यात आल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी आज पालिकेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करून निषेध नोंदवला. 

नगरपरिषदेच्या माध्यमातून सोमवारी संध्याकाळी शहरातील विविध भागात विकासकामांचे उद्घाटन झाले. विशेष म्हणजे सत्ता भाजपची अन उद्घाटने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. साधारण आठ ते दहा ठिकाणी हे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचे फलकही तेथे लावण्यात आले. त्या फलकांवर राज्यमंत्री डॉ. पवार यांचा हा मतदारसंघ असताना नामोल्लेख केलेला नव्हता. या विधानसभेच्या सूज्ञ मतदारांनी लाखोंचे मताधिक्य देऊन त्यांना दिल्लीत पाठवले. 

त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत पक्षाने त्यांना केंद्राच्या मंत्रीमंडळात स्थान देत दिंडोरी लोकसभेसह नाशिक जिल्ह्याला साठ वर्षानंतर न्याय मिळवून दिला. असे असताना पवार यांचा याप्रसंगी विसर पडावा ही खेदजनक बाब असून हा मतदार संघातील मतदारांचा अवमान आहे असे आनंद शिंदे यांनी म्हटले आहे. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली. 

भाजपाचे नगराध्यक्ष, नगरसेवक या कार्यक्रमांना उपस्थित होते. त्यांनी हा अवमान सहन करत उदघाटन केल्याने या घटनेचा निषेध नोंदवला आहे. यानंतर असे घडू नये याची काळजी घ्यावी अन्यथा भारतीय जनता पार्टी या विरोधात आंदोलन उभे करेल असा इशारा देण्यात आला. नगरपरिषदेच्या आवारात धारणा आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिंदे, मिननाथ पवार, दिनेश परदेशी, युवराज पाटोळे, चेतन धसे, सागर नाईकवाडे, गणेश खळेकर, नानासाहेब लहरे, मच्छिंद्र पवार, वैभव खेरूड, संतोष नागपुरे, सचिन धकाते, आकिल शहा, राजू शिंदे, सतीश शिंदे, जालिंदर पवार, करण कातरी, प्रसाद शिंदे, चंद्रकांत शिंदे, दीपक टाकले, गोरख पवारांसह कार्यकर्ते उपस्थित होते. 
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com