सत्ताधाऱ्यांनी यंत्रणेवर दबावासाठी तोडफोडीचा गैरमार्ग निवडला?

महापालिकेच्या बिटको रुग्णालयात नगरसेविका सीमा ताजणे यांच्या पतीने कार घुसवून तोडफोड केली. हा प्रकार म्हणजे आरोग्य व्यवस्थापन मोडीत काढण्याचे कारस्थान आहे. त्यातून जनतेला संकटात लोटण्याचा प्रकार घडू पहात आहे. त्याची तातडीने चौकशी करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॅा. निलम गोह्रे यांनी दिल्या आहेत.
Neelam Gorhe
Neelam Gorhe

नाशिक : महापालिकेच्या बिटको रुग्णालयात नगरसेविका सीमा ताजणे यांच्या पतीने कार घुसवून तोडफोड केली. (Bjp Corporator seema tajne`s Husband attack on Bytco covid Hospital)हा प्रकार म्हणजे आरोग्य व्यवस्थापन मोडीत काढण्याचे कारस्थान आहे. त्यातून जनतेला संकटात लोटण्याचा प्रकार घडू पहात आहे. ( It is to throw people in problems) त्याची तातडीने चौकशी करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॅा. निलम गोह्रे (Vice president Dr. Neelam Gorhe) यांनी दिल्या आहेत. 

नाशिक शहरातील बिटको कोव्हिडं सेंटर मधील भाजपा नगरसेविकेच्या पतीने हॉस्पिटलमध्ये घुसवलेली मोटार व त्यानंतर दहशत निर्माण करण्यासठी केलेल्या गुंडगिरीच्या घटनेची चौकशी व कारवाई करण्यासाठी विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी संपर्क करून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

कोव्हिडं-१९ चा वाढता प्रसारामुळे रुग्ण संख्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठ्याप्रमाणात ताण पडत आहे. शनिवारी नाशिक महानगरपालिकेच्या बिटको कोव्हिड सेंटरमध्ये भाजपा नगरसेविकेच्या पतीने गाडी घालून गोंधळ घातला. त्यामुळे हॉस्पिटलमधील परिस्थिती बिघडली. याबाबत विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी नाशिक महापालिकेतील नगरसेवक अजय बोरस्ते, तसेच महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, पदाधिकारी भैय्या (ओमप्रकाश) बाहेती यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून सर्व घटनेची माहिती घेतली. 

पुणे महापालिका असो वा नाशिक येथील महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेवर दबाब निमार्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्या पक्षातील जेष्ठ नेत्यांनी तेथील महापौर आणि लोकप्रतिनिधी यांना पत्र पाठवून समज दिली पाहिजे असे देखील डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी नमूद केले.

या नाट्याचा पहिला अंक पुणे महापालिकेत नुकताच पार पडला. एकीकडे कोरोनाची संख्या आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्या परीश्रमातुन कमी होत आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या विशेष संवाद साधुन डॅाक्टर्सना मदत करत आहेत. पण केंद्रातील व  नाशिक महापालिकेतील सत्ताधारी व्यक्तीच बेजबाबदार वर्तन करत आहेत, अशा शब्दात डॉ. गोऱ्हे यांनी या घटनेचा निषेध केला.

त्या म्हणाल्या, अशा घटना भविष्यात घडू नये या करिता विभागीय आयुक्तांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या दर पंधरा दिवसाला बैठक घेऊन समस्या जाणून घेण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्तांना केली आहे. त्याचबरोबर झालेल्या घटनेची विभागीय आयुक्तानी  चौकशी करून कार्यवाही करण्याची सूचना देखील त्यांनी दिल्या. 

नाशिक येथील महापौरांनी कार्यशीलता दाखवून मनपा हॉस्पिटलमधील गैरप्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे अशी देखील सूचना डॉ.गोऱ्हे यांनी महापौरांना केली आहे.
...
 

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com