भाजपच्या अंतर्गत वादाची झळ नाशिककरांना बसली! - Shivsena blaim, Bjp Internal rivelary affected people, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या अंतर्गत वादाची झळ नाशिककरांना बसली!

संपत देवगिरे
रविवार, 16 मे 2021

नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. सर्व पदांवर भाजपचे पदाधिकारी विराजमान झालेले आहेत. मात्र याच पक्षाच्या नगरसेविकेचे पती रुग्णालयात तोडफोड करतात. महापौर व प्रशासनाने त्याची जबाबदारी स्विकारावी. शहरातील प्रत्येक कोरोना रुग्णाला योग्य उपचार, सुविधा व नाशिककरांना लस मिळालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे संपर्क नेते भाऊ चौधरी यांनी केली. 

नाशिक : नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. सर्व पदांवर भाजपचे पदाधिकारी विराजमान झालेले आहेत. (BJP is in Power NMC, All Office Bearers are BJP) मात्र याच पक्षाच्या नगरसेविकेचे पती रुग्णालयात तोडफोड करतात. महापौर व प्रशासनाने त्याची जबाबदारी स्विकारावी. (But BJP leader attcked in Hospitals, Mayor shall Except Responsiblity) शहरातील प्रत्येक कोरोना रुग्णाला योग्य उपचार, सुविधा व नाशिककरांना लस मिळालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे संपर्क नेते भाऊ चौधरी (Deemand Shivsena leader Bhau Choudhary) यांनी केली. 

यासंदर्भात ते म्हणाले, उद्या आम्ही या विषयावर पोलिस आयुक्तांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन या प्रश्नाचे गांभिर्य मांडणार आहोत. या प्रकरणाने महापालिकेच्या व्यवस्थेची सगळीकडे लक्तरे निघाली आहेत. महापौरांनी याविषयावर आपली भूमिका अद्याप व्यक्त केलेली नाही. त्यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्विकारावी. नाशिककरांना कोरोनाला तोंड द्यावे लागते. त्यात आरोग्याची व्यवस्था म्हणून महापालिकेने त्यांनी चांगले औषधोपचार, रुग्णालयात वैद्यकीय सुविधा आणि रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठीचे वातावरण निर्माण केले पाहिजे. विशेष म्हणजे प्रशासनाने डोळ्यावर कातडे ओढून घेऊ नये. अन्य़था नाशिककरांच्या अडचणींवर शिवसेना स्वस्थ बसणार नाही. 

ते म्हणाले, महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची मानसिकता पाहता त्यांचा प्रशासनावर काहीही वचक नसल्याने शहरात अनेक समस्या वाढल्या आहेत. शहरातील महापालिकेच्या बिटको कोविड रुग्णालयात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेच्या पतीनेच हल्ला केला. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. भाजपच्या अंतर्गत वादाची झळ नाशिककरांना बसली आहे. पक्षाच्या अंतर्गत राजकीय वादाची झळ शहराला बसू नये. कोरोना काळात डॉक्टर, नर्सेस , सपोर्टींग स्टाफ आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करत आहे, त्यांच्यावरचा हा विकृत हल्ला आहे. दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा झालीच पाहिजे.

सर्वांना लस हवी
ते म्हणाले, सध्या लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र शहरात प्रत्येक केंद्रावर नागिरकांची तोबा गर्दी होते. अनेकांना लस मिळत नाही. अशा स्थितीत महापालिका प्रशासनावर मोठी जबाबदारी आहे. त्याचा त्यांनी विचार करून योग्य नियोजन करावे. महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई महापालिकेप्रमाणेच ग्लोबोल टेंडर काढून शहराला लागणाऱ्या लसखरेदी कराव्यात. सर्वांना त्यांच्या घरी जाऊन किंवा कोणतिही गैरसोय न होता लस मिळेल अशी व्यवस्था करावी.
...  
हेही वाचा....

उपचार घेता घेता कोरोनाग्रस्तांनी जिंकली बक्षिसे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख