..तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही

महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांची रिक्षा आहे. त्यांनी केलेला भ्रष्टाचार, अत्याचारामुळे नागरिकांमध्ये आक्रोश वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द होण्यास हेच सरकार जबाबदार आहे. येत्या तीन महिन्यांत ओबीसींचा इम्पिरिकल डाटा तयार केला नाही, तर महाआघाडीच्या मंत्र्यांना भाजप रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा भाजपचे महामंत्री व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
Bavankule
Bavankule

नंदुरबार : महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांची रिक्षा आहे. (Mahavikas aghadi government is Threewheeler) त्यांनी केलेला भ्रष्टाचार, अत्याचारामुळे नागरिकांमध्ये आक्रोश वाढला आहे. (It is corrupt government) स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द होण्यास हेच सरकार जबाबदार आहे. (State Government is responsible for OBC reservation issue) येत्या तीन महिन्यांत ओबीसींचा इम्पिरिकल डाटा तयार केला नाही, तर महाआघाडीच्या मंत्र्यांना भाजप रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा भाजपचे महामंत्री व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी दिला.

भाजयुमोतर्फे युवा वॉरियर अभियान राज्यभर राबविले जात आहे. त्यानिमित्त गुरुवारी श्री. बावनकुळे, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, प्रदेश संघटन चिटणीस अनुप मोरे व पदाधिकारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी भाजपच्या जिल्हा कार्यालयात सकाळी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, सरकारने इम्पेरीकल डेटा न्यायालयात सादर केला नाही. उलट ते केंद्र सरकारकडून डेटा मागत आहेत. त्यात ६९ लाख चुका आहेत. त्यापेक्षा तीन महिन्यांत नवीन डेटा तयार होऊन सादर होणे शक्य आहे. मात्र, तिन्ही पक्षांतील नेते एकमेकांची कुरघोडी काढून मीडिया ट्रायलमध्ये वेळ घालवीत आहेत. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत ओबीसींचा इम्पिरिकल डाटा तयार केला पाहिजे. 

श्री. बावनकुळे पुढे म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारने ज्या योजनेत भ्रष्टाचार करता येत नाही, त्या योजना बंद पाडल्या. विशेषतः डीबीटी योजनेत काहीच मिळत नाही, म्हणून रोजगार हमी योजना, संजय गांधी योजना, आपत्ती व्यवस्थापन योजना बंद पाडल्या आहेत. `डीपीडीसी`च्या पैशांनाही कट मारला आहे. खावटीचा पैसाही थांबविला आहे. राज्यात एकही पालकमंत्री काम करीत नाहीत. मंत्रिपदाचा वापर केवळ स्वतःच्या मतदारसंघासाठी करीत आहेत. एक हजार कोटींचा तांदूळ घोटाळा झाला.  रेशनचा तांदूळही या सरकारला पुरला नाही, असे या सरकारचे काम आहे. पंढरपूरला तिन्ही पक्ष आले, तरी तेथील जनतेने यांना नाकारले, तशीच स्थिती धुळे, नंदुरबार, जळगावमध्येही आहे. आगामी निवडणुकीत जनता या सरकारला नाकारल्याशिवाय राहणार नाही.

चौकशीला तयार...
जलयुक्त शिवार योजना अत्यंत चांगली आहे. त्यांनी कोणतीही चौकशी करावी, आम्ही तयार आहोत. मात्र, चांगली योजना थांबवू नये. ‘खोटे बोला पण रेटून बोला,’ असे महाविकास आघाडी सरकारचे काम आहे.

नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करा
नंदुरबार जिल्ह्यात एकीकडे पाऊस नाही, शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी दुबार पेरणीसाठी हताश झाले आहेत. त्यांना दुबार पेरणीसाठी अनुदान देणे दूर मात्र या सरकारच्या मंत्र्यांना एकमेकांच्या उण्यादुण्या काढण्यातच वेळ पुरत नाही. नंदुरबार जिल्ह्यात पावसाची गंभीर स्थिती आहे. हा जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, अशी आपली शासनाकडे मागणी आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश सदस्य राजेंद्रकुमार गावित आदी उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com