अजिततदादा म्हणजे प्रत्येकाने अनुकरण करावे असा नेता! - Ajit pawar is a leader whom every youth shall Follow; Maharashtra Politics | Politics Marathi News - Sarkarnama

अजिततदादा म्हणजे प्रत्येकाने अनुकरण करावे असा नेता!

संपत देवगिरे
गुरुवार, 22 जुलै 2021

महाराष्ट्राला विचार, नेतृत्व आणि कृतिशील आचरण असलेल्या नेत्यांचा मोठा व प्रदीर्घ वारसा आहे. हा वारसा पुढे नेण्याचे सामर्थ्य आणि दृष्टी असलेला नेता म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे सबंध महाराष्ट्र पाहातो, असे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी सांगितले.
 

नाशिक : जिल्ह्यातील घडामोडींवर त्यांचे अतिशय बारीक लक्ष असते. (Ajit Pawar keeps attention on nashik Devolopment & updates) जिल्ह्यातील शेती, सिंचन, भाजीपाला, साखर कारखाने, विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांसह विकासकामांचे विषय ते प्राधान्याने मार्गी लावतात, (He solve th various issues regarding Agreeculture, Farming, Sugar factory, & devolopmental projects) असा सगळ्यांचा अनुभव आहे.

नुकतेच ते नाशिकच्या दौऱ्यावर येऊन गेले. मराठा विद्याप्रसार समाज संस्थेच्या शैक्षणिक वारसा संग्रहालय, तसेच पॅालिटेक्नीकच्या इमारतीचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी त्या इमारतीचे बांधकाम, त्याची गुणवत्ता कंत्राटदारांकडून समजून घेतली. या कार्यक्रमात संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी संस्थेच्या अडचणी व मागण्या मांडण्याचे विसरून गेल्या. मात्र अजितदादांनी त्याचा आवरजून उल्लेख केला. त्यावर न थांबता त्यांनी संस्थेला पाच कोटींचा निधी जाहीर केला. देवळाली मतदारंसघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन त्यांनी केले. या कामांची संपूर्ण माहिती त्यांनी घेतलीच मात्र आमदार सरोज आहिरे यांच्या मतदारसंघातील कामांसाठी त्यांनी थेट पाच कोटी रुपयांची देणगी जाहीर केली. त्यातून या मतदारसंघातील प्रलंबित कामांचे महत्त्व त्यांना इतर सगळ्यांपेक्षा अधिक जाणवले. त्यावर न थांबता ती मार्गी लावण्यासाठी त्यांनी तातडीने पावले उचलली.

अजितदादा अगदी पहाटे काम सुरू करतात. त्यांनी सुरू केलेले काम अगदी रात्री एक-दीड पर्यंत चालते. वर्षातील सर्व दिवस सलग व न थांबता, कंटाळता काम करणारा अन्य नेता सापडणार नाही. सध्या ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्याचवेळी कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या प्रशासनाचे मनोबल वाढविण्यासाठी सबंध महाराष्ट्र पालथा घताला आहे. अनेक जिल्ह्यात जाऊन त्यांनी आढावा बैठका घेतला. तेथील कामकाज कसे चालते, त्यात काय सुधारणा हव्यात, कशी कार्यशैली असावी याबाबत ते अत्यंत जागरूकपणे दिशादर्शन करीत असल्याचे मी पाहिले आहे. त्यामुळे मला मतदारसंघातील नागरिकांच्या समस्यांचे निवारण कसे करावे, विकासकामांना कशी गती द्यावी याबाबत अनेक आमदारांना ते स्वतः सांगतात. एवढा बारीकसारीक तपशील त्यांच्याकडे असतो.

अजितदादांच्या कामाचा झपाटा, विकासाची दृष्टी पहायची असेल तर आजचे पुणे शहर व सभोवतालचा परिसर त्याची साक्ष देतो. सर्वांत वेगानं विस्तारलेलं नियोजनबद्ध विकसित शहर म्हणजे पिंपरी-चिंचवड म्हणता येईल. कोणतेही शहर व त्याच्या सुविधांचा विस्तार करताना त्यामागे कोणाचा तरी खंबीर पाठिंबा लागतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी त्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यात सिंहाचा वाटा आहे. गेल्या पंचवीस वर्षांत राजकीय व प्रशासकीय ताकद देऊन या शहराचा चेहरामोहरा त्यांनी बदलला. हे शहर नावारुपाला आले. विविध उद्योगांनी येथे आपला विस्तार केला. त्यातून नव्या देशातील पिढीला हे शहर आकर्षित करू लागले आहे.

अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या. उद्योगांची मुहूर्तमेंढ रोवण्यात आली. एकविसाव्या शतकाला साजेसे हे शहर करण्यात अजितदादांचे योगदान त्यात प्रकट झालेले दिसते. त्यामुळे नव्या पिढीला राजकारणात येताना, कसे काम करावे, त्यांच्यापुढे कोणाचा आदर्श असावा तर त्यात दादांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल. प्रशासनावर असलेली त्यांची पकड, कामाचा वेग, वेळेला महत्त्व आणि काटेकोरपणा, रोखठोक बोलणे व कामाचा मोठा आवाका हे सर्व निर्णयक्षमतेमुळे त्यांनी साध्य केले आहे. त्यामुळे सर्वच वयोगटांतील मतदार, नागरिक जो त्यांच्या संपर्कात येतो, तो त्यांच्या प्रेमात पडतो. त्यामुळे केवळ राजकारणच नव्हे तर विविध क्षेत्रांतील मंडळी त्यांच्या कामाला दाद देतात.

नाशिकचे अनेक प्रश्‍न घेऊन मी स्वतः स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते आणि कार्यकर्त्यांसमवेत त्यांच्याकडे गेलो आहे. या प्रत्येकवेळी कार्यकर्ते जे सांगतात, त्याचे ते अतिशय बारकाईने समजून घेतात. मी ज्या ज्या वेळी दादांना काम सांगितले त्या त्या वेळी त्यांनी काम मार्गी लावले आहे. त्यांच्या कामकाजाची पद्धत फारच शिस्तबद्ध आहे. एखाद्या कामाचे पत्र आपण त्यांना दिल्यानंतर कदाचित ते आपल्याही लक्षात राहणार नाही, मात्र त्यांनी त्याची दखल घेतलेली असते. जेव्हा त्यांच्या ऑफिसमधून फोन येईल तेव्हा कळायचे. त्या कामाबाबतची मीटिंगही लावून संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थितीही आवर्जून असते. कमी वेळेत साधकबाधक चर्चा करून समयसूचकता दाखविण्यात त्यांचा हातखंडा आहे. कामाची नोंद इतिवृत्तात नोंदवून त्याला वैधानिक स्वरूप देण्यावर त्यांचा भर असतो. ज्या गोष्टी स्वतःच्या अखत्यारित नसताना त्या आदेशित करून तो प्रश्न सोडविण्याची त्यांची क्षमता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.
...

हेही वाचा...

आम्ही पाणी मागीतले, अजितदादांनी धरण दिले!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख