नाशिकला कोरोना रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी मोठी घट

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्‍याने आढळलेल्‍या रुग्‍णांच्‍या तुलनेत कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक राहिली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत मोठी घट झाली आहे.
Covid 19
Covid 19

नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्‍याने आढळलेल्‍या रुग्‍णांच्‍या तुलनेत कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक राहिली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत मोठी घट झाली आहे. बुधवारी दिवसभरात दोन हजार ३६६ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर पाच हजार २२१ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. ३५ बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत दोन हजार ८९० ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात २५ हजार ९६९ बाधित उपचार घेत आहेत.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्‍णांमध्ये नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक दोन हजार ९८३, नाशिक महापालिका क्षेत्रातील दोन हजार १५९, मालेगावच्‍या ४९ तर, जिल्‍हा बाहेरील तीस रुग्‍णांचा समावेश आहे. नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार २१७, नाशिक ग्रामीणमधील एक हजार ०९७, तर मालेगावच्या ५२ रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला. जिल्‍हाभरातील सहा हजार २५५ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी चार हजार ४०६ अहवाल नाशिक ग्रामीण भागातील आहेत.

नाशिक शहरातील एक हजार ६०८, मालेगावच्‍या २४१ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दोन हजार ८७५ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील दोन हजार ५९९ रुग्‍णांचा समावेश होता. जिल्‍हा रुग्‍णालयात सहा, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात पंधरा रुग्‍ण दाखल झाले. तसेच, नाशिक ग्रामीणमधील २१७ व मालेगावच्‍या ३८ रुग्‍णांचा यात समावेश आहे.

...
नाशिक शहरात २३ मृत्‍यू
बुधवारी जिल्ह्यात ३५ बाधितांचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद असून, यात सर्वाधिक २३ मृत नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. शहरात जेल रोड भागातील चार, तसेच सातपूर, पाथर्डी फाटा, सिडको, नाशिक रोड, काठे गल्‍ली या भागांतील प्रत्‍येकी दोन बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. नाशिक ग्रामीणममध्ये निफाड, कळवण, सिन्नर आणि त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील प्रत्‍येकी दोन बाधितांचा मृत्‍यू झाला. एकलहरे, दिंडोरी, येवला, सुरगाणा व दिंडोरी तालुक्‍यातील प्रत्‍येकी एक रुग्‍ण कोरोनाने दगावल्‍याची नोंद आहे.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com