बंगालमध्ये आमदारकीची शपथ घेण्याआधीच भाजपच्या दोन आमदारांनी दिला राजीनामा - two bjp mlas from west bengal resign from assembly seats | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

बंगालमध्ये आमदारकीची शपथ घेण्याआधीच भाजपच्या दोन आमदारांनी दिला राजीनामा

वृत्तसंस्था
बुधवार, 12 मे 2021

भाजपने बंगालची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. अखेर बंगालमध्ये भाजपचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगले आहे. 

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सत्ता मिळवण्याची हॅटट्रिक केली आहे. भाजपने (BJP) ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. अखेर बंगालमध्ये भाजपचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगले आहे. आता भाजपच्या निवडून आलेल्या दोन आमदारांनी (MLA) राजीनामा दिला आहे. आमदारकीची शपथ घेण्याआधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजप स्वप्न भंगले आहे. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 213 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. या वेळी 77 जागांसह भाजप प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी सत्ता स्थापन केली आहे. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. अखेर ममतांची बंगाली अस्मिता भाजपवर भारी पडली आहे.  

भाजपने दिनहाटा मतदारसंघातून निसित प्रामाणिक आणि जगन्नाथ सरकार यांना संतीपूर मतदारसंघातून मैदानात उतरवले होते. हे दोघेही निवडून आले आहेत. परंतु, हे दोघेही खासदार आहेत. प्रामाणिक हे कूचबिहारचे तर सरकार हे राणाघाटचे खासदार आहेत. या दोघांनीही आज आमदारकीचा राजीनामा दिला. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या दोन्ही नेत्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. या दोन्ही नेत्यांनी खासदार म्हणूनच काम करावे, असे पक्षाने ठरवले आहे. यामुळे आमदार म्हणून शपथ घेण्याआधीच या नेत्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. 

हेही वाचा : रुग्णवाहिकेतून आणून कोरोनाबाधितांचे मृतदेह गंगेत टाकले; भाजप खासदाराचा गौप्यस्फोट 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागांपैकी 292 जागांवर निवडणूक झाली होती. दोन जागांवरील उमेदवारांचा मृत्यू झाल्याने ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. आता भाजपच्या दोन आमदारांनी दिलेले राजीनामे आणि आधीच्या दोन मतदारसंघातील प्रलंबित निवडणूक अशी चार मतदारसंघात पोटनिवडणूक पुढील सहा महिन्यांत होईल. 

भाजपने या वेळी लोकसभेच्या चार खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले होते. यात सरकार आणि प्रामाणिक यांचा विजय झाला तर लॉकेट चटर्जी आणि बाबूल सुप्रियो यांचा पराभव झाला. चटर्जी आणि सुप्रियो यांचा विधानसभेला पराभव झाला असला तरी ते खासदार राहणार आहेत. आता प्रामाणिक आणि सरकार यांनी विधानसभेचा राजीनामा दिल्याने तेसुद्धा खासदार राहणार आहेत. भाजपकडून राज्यसभेचा राजीनामा देऊन स्वपन दासगुप्ता हे विधानसभा लढले होते. परंतु, त्यांचाही पराभव झाला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख