कोकाटेंच्या मतदारसंघात आदिवासी वस्तींसाठी १.२८ कोटींचा निधी

सिन्नर तालुक्यातील सतरा गावांतील आदिवासी वस्त्यांत ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत विकास कामे करण्यासाठी १ कोटी २८ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
Manikrao Kokate
Manikrao Kokate

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील सतरा गावांतील आदिवासी वस्त्यांत ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत विकास कामे करण्यासाठी १ कोटी २८ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यातून बहुतांश आदिवासी वस्त्यांमध्ये आता पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या आदिवासी बांधवांना मुबलक व शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून हा निधी मंजूर झाला असून विकासकामांना चालना मिळणार आहे.

ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत सिन्नर विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींनी विकास कामांचे प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सादर केले होते. ग्रामपंचायतींच्या या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यासाठी आमदार कोकाटे यांनी शिफारस केल्याने १७ गावांमध्ये १ कोटी २८ लाख ९२ हजार रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. संबंधित गावातील आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.
पिण्याच्या पाण्याची सुविधा

पांगारवाडी, कुंदेवाडी व वडांगळी येथे ७ लाख ५० हजार रुपयांतून जलकुंभ व जलवाहिनीची कामे होणार आहेत. जोगलटेंभी येथे जलकुंभासाठी ७ लाख ४९ हजार तर हरसुले येथे पाणीपुरवठा योजनेसाठी ७ लाख ४९ हजार, वडगाव सिन्नर येथे १२ लाख ४९ हजार, शास्त्रीनगर २ लाख ५० हजार रुपये मंजूर झाले आहेत. शुद्ध पाण्याचे संयंत्र बसविण्यासाठी भाटवाडी येथे ३ लाख ९५ हजार, कोमलवाडी, विंचूर दळवी, मापारवाडी, शहा या गावांना प्रत्येकी ७ लाख ५९ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे आदिवासी बांधवांनाही मुबलक व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

मंगल कार्यालयाची सुविधा
वडगाव सिन्नर, ढोमाची वाडी, धुळवड, चापडगाव येथे प्रत्येकी १५ लाख रुपयातून मंगल कार्यालय बांधकाम होणार आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांची लग्न व इतर कार्यक्रमांची मोठी सोय होणार आहे. त्यातून त्यांची होणारी आर्थिक ओढाताणही थांबणार आहे. देशवंडी व दहिवाडी येथे प्रत्येकी ७ लाख ५० हजार रुपयांचे सभामंडपाची कामे मंजूर झाली आहेत.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com