फुटीर नगरसेवकांचा भाजपला दणका : गटनेते, उपगटनेत्याची पदावरून हकालपट्टी - Separate corporators of Jalgaon Municipal Corporation sacked BJP group leaders and subgroup leaders his post | Politics Marathi News - Sarkarnama

फुटीर नगरसेवकांचा भाजपला दणका : गटनेते, उपगटनेत्याची पदावरून हकालपट्टी

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 जुलै 2021

त्यातून महापालिकेत शिवसेनेचा महापौर विराजमान झाला.

जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात आज (ता. ६ जुलै) पुन्हा भारतीय जनता पक्षाला दणका बसला आहे. भारतीय जनता पक्षातील फुटलेल्या २९ नगरसेवकांनी बैठक घेऊन भाजपचे गटनेते, उपगटनेते यांची हकालपट्टी करून नवीन पदाधिकारी नियुक्त केले आहेत. (Separate corporators of Jalgaon Municipal Corporation sacked BJP group leaders and subgroup leaders his post)

जळगाव महापालिकेत गेल्या काही महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या २९ नगरसेवकांनी फुटून शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यातून महापालिकेत शिवसेनेचा महापौर विराजमान झाला. जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता जावून शिवसेनेची सत्ता आली. त्यानंतर आज या प्रकाराला नाट्यमय कलाटणी मिळाली. फुटीर भाजप नगरसेवकांनी स्वतंत्र बैठक घेऊन महापालिकेत नवीन पदाधिकारी नियुक्त केले आहेत.

हेही वाचा : कर्ज घेण्याची पत संपल्याने दूध संघाचा जागाविक्रीचा निर्णय

या गटाचे सभागृह नेते ललित कोल्हे यांनी यासंदर्भात महापौरांना पत्र देवून नवीन पदाधिकारी नियुक्तीस मंजुरी देण्याची मागणी केली आहे. त्या पत्रात कोल्हे यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाचे गटनेते असलेले भगत बालानी यांना बदलवून त्यांच्या रिक्त जागेवर दिलीप बबनराव पोकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपगटनेते राजेंद्र झिपरू पाटील यांच्या जागी चेतन गणेश सनकत यांची निवड करण्यात आली आहे. लोकशाही पद्धतीने ठराव करून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, असेही सभागृह नेते कोल्हे यांनी म्हटले आहे. या बैठकीचे रितसर प्रोसेडिंग करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी प्रोसेडिंग बुकची प्रतही त्यांनी दिली आहे,यात २९ नगरसेवकांच्या सह्या आहेत.

पद वाचविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न : भगत बालाणी

भारतीय जनता पक्षातून फुटलेल्या या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. लवकरच त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे, त्यामुळे त्यांचा बचावासाठी केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र, त्यांच्या या सर्व नियुक्त्या बेकायदेशीर आहेत, असे जळगाव महापालिकेतील भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख