अखेर `नासाका`साठी देविदास पिंगळेंचा प्रस्ताव शासनाला सादर!

येथील नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) भाडेतत्त्वावर घेऊन सुरू करण्याबाबत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केलेला प्रस्ताव पणन संचालकांनी शासनाला सादर केला आहे.
अखेर `नासाका`साठी देविदास पिंगळेंचा प्रस्ताव शासनाला सादर!
NSK Pingle F

नाशिक : येथील नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) भाडेतत्त्वावर घेऊन सुरू करण्याबाबत (Nashik sugar foctory starts on rental basis proposal submits to government by CO-operative dept.) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केलेला प्रस्ताव पणन संचालकांनी शासनाला (Marketing director submits the proposal with his expert opinion) सादर केला आहे. त्यामुळे गेल्या सात ते आठ वर्षांपासून बंद असलेला नाशिक साखर कारखाना सुरू होण्याच्या आशा (Now chances for nashik sugar foctory reopen is increase) पल्लवित झाल्या आहेत. 

बाराशे मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्याचे नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात जवळपास सतरा हजार सभासद आहेत. कारखाना बंद असल्याने शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी व अडचणींवर मात करण्यासाठी नासाका सुरू होणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेऊन नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे व देवळाली मतदासंघाच्या आमदार सरोज आहिरे यांनी प्रयत्न सुरू केले होते. 

उभयतांची सहकारमंत्र्यांसह साखर आयुक्तांसमवेत बैठकही झाली. त्यानंतर ९ जुलै २०२१ ला बाजार समिती व नासाकाचे सभासद यांच्यासोबत चर्चा करून संचालक मंडळाने एकमताने निर्णय घेत नाशिक साखर कारखाना पूर्ववत करण्यासाठी दोन ठराव केले होते. हा प्रस्ताव सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक यांना पाठविला होता. तो त्यांनी पुढील कार्यवाहीसाठी पणन संचालकांकडे पाठविला होता. यावर पणन संचालकांनी अभ्यासपूर्ण टिपणी करीत हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. 

सतरा कोटींच्या कर्जास परवानगी 
या प्रस्तावात महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास अधिनियम १९६३चे कलम २९,३७ व ५९ नुसार 'नासाका' भाडे तत्त्वावर चालविण्याबरोबरच त्यासाठी १७ कोटी रुपये कर्ज उभारणीसाठी परवानगीही मागितली आहे. त्यामुळे आता नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू होण्याच्या आशा वाढल्या असून, शेतकरी व कामगारांचा प्रश्न लवकरच सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

...
'नासाका'साठी निविदाप्रक्रियेत अन्य कोणी सक्षम व्यक्ती वा संस्था पुढे आल्यास बाजार समिती माघार घेऊन त्यांस पाठिंबा दर्शवेल. केवळ शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन बाजार समितीने हे प्रयत्न सुरू केले आहेत. एकदा कारखाना सुरू झाल्यानंतर गाळप क्षमता १२०० टनावरून ५ हजार टनांवर नेण्याचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर बँकेचे सर्व कर्ज फेडण्यात येईल. शिवाय १५ वर्षानंतर कारखाना सभासदांच्या मालकीचा होईल, असा ठाम विश्वास आहे. 
- देविदास पिंगळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक. 
...
हेही वाचा...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in