दादा भुसे संतापले; `इफको-टोकियो` विरोधात गुन्हा दाखल करणार  - Dada Bhuse angree on IFFCO-TOKEYO Ins. co.; Amravati politics  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

दादा भुसे संतापले; `इफको-टोकियो` विरोधात गुन्हा दाखल करणार 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 जुलै 2021

इफको-टोकियो या विमा कंपनी विरोधात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा अमरावती शहरातील काँग्रेस नगर रोड स्थित इफको-टोकियो या विमा कंपनीच्या कार्यालयाकडे कडे वळविला.

अमरावती : राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. (Agreeculture minister Dada Bhuse on Amravati tour) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे (Heavy rains in area from last two days which results in crop loss) नुकसानीच्या पाहणीसाठी थेट बांधावर जात आहेत. यावेळी झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी (Minister will take review of crop loss today also) ते आज देखील करणार आहेत.

तत्पूर्वी त्यांना इफको-टोकियो या विमा कंपनी विरोधात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा अमरावती शहरातील काँग्रेस नगर रोड स्थित इफको-टोकियो या विमा कंपनीच्या कार्यालयाकडे कडे वळविला.

पीक विमा मिळण्यासाठी कंपनीच्या  प्रतिनिधीकडून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी टाळाटाळ कऱण्यात येत होती. कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना चांगली वागणूक देत नव्हते. सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेत कृषी मंत्री भुसे यांनी स्वतः इफको-टोकियो या  विमा कंपनीमध्ये ही भेट दिली होती. त्यांनी विविध बाबींची तपासणी केली. 

यावेळी कार्यालयात आवश्यक कार्यवाहीसाठी यंत्रणा आढळून आली नाही. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी योग्य कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले. उपस्थित प्रतिनिधीकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. त्यामुळे मंत्री भुसे यांना योग्य माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी या कंपनीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. या वेळी जिलाधिकारी व कृषि विभागाचे सर्वच अधिकारी उपस्थित होते
...
हेही वाचा...

आपत्तीग्रस्तांना कोरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख