जमीन मोजणीला पुन्हा याल; तर याद राखा!

बैठकीत कोणत्याही विषयावर सहमती झालेली नाही.
The farmers sent back the officials who came to survey the land of Pune-Nashik railway
The farmers sent back the officials who came to survey the land of Pune-Nashik railway

राजगुरुनगर (जि. पुणे) : ‘नियोजित पुणे- नाशिक रेल्वेमार्गासाठी आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत. शासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत कोणत्याही विषयावर सहमती झालेली नाही. असे असताना तुम्ही थेट जमीन मोजणीसाठी कसे काय आलात?’ असा सवाल करून, ‘पुन्हा याल तर याद राखा,’ अशी तंबी देत मोजणीसाठी आलेल्या रेल्वे अधिकारी व मोजणी कर्मचाऱ्यांना खेड तालुक्यातील होलेवाडी व मांजरेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २४ मे) पिटाळून लावले. (The farmers sent back the officials who came to survey the land of Pune-Nashik railway)

नियोजित पुणे -नाशिक रेल्वेमार्गासाठी संपादन करावयाच्या जमिनींच्या मोजणीसाठी होलेवाडी, मांजरेवाडी, टाकळकरवाडी परिसरात रेल्वे अधिकारी व मोजणी कर्मचारी आले होते. मात्र, भूसंपादनासाठी सहमती, मोबदला इत्यादींवर काही चर्चा, तोडगा नुकत्याच शेतकऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत निघालेला नसतानाही मोजणी सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाले होते. भूसंपादनाला शेतकऱ्यांची संमती नसून जमीन मोजणीची प्रक्रिया थांबविण्यात यावी, असे निवेदन त्यांनी खेड उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेले होते. तरीही मोजणीसाठी पथक आल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. 

या परिसरातील शेतकऱ्यांच्या बागाईत जमिनी रेल्वेमार्गासाठी संपादित होत आहेत. त्यातही अनेक अल्पभूधारक शेतकरी आहेत. आधीच तुटपुंजी असलेली शेतजमीनही जाणार असल्याने हे शेतकरी उद्विग्न झाले आहेत.

रेल्वेसाठी किती जमीन भूसंपादित करण्यात येणार आहे. जमिनीला किती भाव देणार आहेत. रेल्वेमार्ग सोडून आजूबाजूची किती जमीन घेतली जाणार आहे, याबाबत शेतकऱ्यांना काहीच माहिती दिलेली नाही. नुकत्याच झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी हे प्रश्न विचारले असता त्यांची उत्तरे न देताच बैठक आटोपण्यात आली. त्यानंतर सोमवारी थेट मोजणीसाठी पथक आल्याने शेतकऱ्यांनी त्यांना पिटाळून लावले. 

या वेळी नवनाथ होले, अर्जुन मांजरे, जयसिंग मांजरे, एकनाथ मांजरे, गणेश मांजरे, युवराज मांजरे, बबनराव मांजरे, महादू होले, रोहिदास टाकळकर, चंद्रकांत टाकळकर, योगेश मांजरे, अमोल होले, सुभाष मांजरे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com