मराठा आरक्षण मिळणार असेल, तर उद्याच खासदारकीचा राजीनामा देतो : संभाजीराजे

समाजाने सांगितले तर मी खासदारकीचा राजीनामा देण्यास कधीही तयार आहे.
If the Maratha community gets reservation, then I will resign as an MP tomorrow: Sambhaji Raje
If the Maratha community gets reservation, then I will resign as an MP tomorrow: Sambhaji Raje

सोलापूर : खासदारकीचा राजीनामा देऊन जर मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल, तर उद्याच खासदारकीचा राजीनामा देतो. समाजाचं म्हणणं असेल मी कधीही राजीनामा देण्यास तयार आहे. अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज (ता. २४ मे) सोलापुरात बोलताना दिली. (If the Maratha community gets reservation, then I will resign as an MP tomorrow: Sambhaji Raje)

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संयमाची भूमिका घेतली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची ही वेळ नाही, असे सांगून मराठा समाजालाही शांत राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचे घोषित केले होते. 

संभाजीराजे हे त्यांनी केलेल्या घोषणेनुसार आजपासून (ता. २४ मे) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. आज (ता. २४ मे) सकाळी त्यांनी कोल्हापुरातून राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन या दौऱ्याला सुरुवात केली. कोल्हापुरातून सुरु झालेला हा छत्रपती संभाजीराजेंचा दौरा पंढरपूर, तुळजापूर, उस्मानाबाद, नांदेड, नाशिक आणि शेवटी मुंबई असा असणार आहे. 

हा महाराष्ट्र दौरा कोणत्याही सरकार किंवा पक्षाविरोधात नाही, असे संभाजीराजेंनी बोलताना स्पष्ट केलं. हा दौरा झाल्यानंतर येत्या 28 मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील संभाजीराजे भेट घेणार आहेत. 

दरम्यान, आरक्षण रद्द होण्याअगोदरच्या नियुक्त्या राज्य सरकारने कराव्यात, अशी मागणीही या वेळी छत्रपती संभाजीराजेंनी केली. सारथी संस्थेची दुरवस्था आणि मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्नही प्रलंबित आहे. त्यावर राज्य सरकारने तत्काळ पावलं उचलावीत, असेही संभाजीराजे छत्रपती या वेळी म्हणाले. 

खासदार झाल्यानंतर दिल्लीतील सर्वात मोठी आणि पहिली शिवजयंती मी साजरी केली आहे. त्या कार्यक्रमाला राष्ट्रपतीपासून सर्व मोठे नेते उपस्थित होते. त्यावेळी मी राष्ट्रपतींना शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट दिले. त्यानंतर ते राष्ट्रपती भवनात लावण्यात आले. तोपर्यंत राष्ट्रपती भवनात शिवाजी महाराजांचे तैलचित्र नव्हते. खासदार झाल्यामुळेच मला ते करता आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंतीही संसदेत मी सुरू केली, असेही संभाजीराजेंनी नमूद केले.

ते म्हणाले की खासदार असल्यामुळे दबाव टाकून रायगड प्राधिकरणाची स्थापना करता आली. त्या माध्यमातून रायगड किल्ल्याचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून पहिल्या दहा किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे, त्या पहिल्या दहामध्ये सोलापुरातील भूईकोट किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे आणि तो मी केला आहे.

मी आजपर्यंत अराजकीय भूमिका घेऊनच काम करत आलो आहे, त्यामुळे समाजाने सांगितले तर मी खासदारकीचा राजीनामा देण्यास कधीही तयार आहे, अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com