शब्दांचा खेळ करून मराठा समाजातील तरुणांची दिशाभूल

रखडलेल्या नियुक्त्यांबद्दल राज्य सरकारने काढलेला शासन आदेश म्हणजे मराठा समाजातील विद्यार्थ्यांची केलेली फसवणूक आहे. सप्टेंबर २०२० पूर्वीच्या नियुक्त्या कायम करणे असा शब्दप्रयोग यामध्ये केला आहे. त्यामुळे निवड होऊनही नियुक्तीपत्र न मिळाल्याने मराठा समाजातील तरुण, तरुणींची नियुक्ती शासनाच्या या आदेशाप्रमाणे होऊ शकणार नाही.
Samarjitsingh Ghatge
Samarjitsingh Ghatge

कोल्हापूर : रखडलेल्या नियुक्त्यांबद्दल राज्य सरकारने काढलेला शासन आदेश म्हणजे मराठा समाजातील विद्यार्थ्यांची केलेली फसवणूक आहे. (Pending appointments GR is bluff to Maratha community youth by State Government) सप्टेंबर २०२० पूर्वीच्या नियुक्त्या कायम करणे असा शब्दप्रयोग (words used is appointments before septeber 2020) यामध्ये केला आहे.

त्यामुळे निवड होऊनही नियुक्तीपत्र न मिळाल्याने मराठा समाजातील तरुण, तरुणींची नियुक्ती शासनाच्या या आदेशाप्रमाणे होऊ शकणार नाही. ही मराठा समाजाची दिशाभूल आहे, असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjitsingh Ghatge) यांनी केला आहे. याबाबतचा त्यांच्या व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला आहे.

घाटगे यांच्या व्हिडिओतील माहितीप्रमाणे, ‘‘मराठा समाजाच्या रखडलेल्या नियुक्ती संदर्भात सरकारने जो शासकीय आदेश काढला तो बोगस वाटावा असाच आहे. कोणाच्या कायदेशीर सल्ल्याने हा शासकीय आदेश काढला ते पाहावे लागेल. ९ सप्टेंबर २०२० च्या आधी केलेल्या नियुक्त्या कायम करणे असा शब्दप्रयोग करून त्याचा धिंडोरा पिटला गेला; पण मराठा समाजाच्या रखडलेल्या नियुक्ती बाबतची मागणी काय होती.

निवड (सिलेक्शन) झाली आहे; पण नियुक्तीपत्रच दिलेले नाही. तर नियुक्त्या कुठून करणार. शब्दांचा खेळ कसा करायचा हे या शासकीय आदशातून शिकले पाहिजे. ही नियुक्ती पत्र देणे प्रलंबित का राहिले? तर राज्य सरकारने ठोस निर्णय न घेतल्यामुळे नियुक्ती पत्र देणे प्रलंबित राहिले. न्यायालयाचा आदेश असूनही नियुक्ती पत्र दिले नाही. आता तर या पात्र उमेदवारांची आणखी ससेहोलपट सरकारने केली आहे. ज्यांनी ई.डब्ल्यु,एस मध्ये धरत नाही. काही जणांनी ओपनमध्ये टाकले आहे. ज्या पोस्टसाठी निवड झाली त्यापेक्षा खालची पोस्ट दिल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत. ज्या शासकीय आदेशाचा बेस धरून तुम्ही मराठा समाजाची मागणी पूर्ण केल्याचा गाजावाजा केला. ही मराठा समाजाची फसवणूक आहे.

तरुणांच्या पाठीशी
मराठा समाजाला दिलेला कोणताही शब्द तुम्ही पाळला नाही. त्यांना या शासकीय आदेशाने बहुजन समाजातील तरुण, तरुणींची फसवणूक केली आहे. माझे या विद्यार्थ्यांना आवाहन आहे तुम्ही खचून जाऊ नका मी नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. या सरकारला हे विद्यार्थीच धडा शिकवतील, असा इशारा घाटगे यांनी या व्हिडिओद्वारे दिला आहे.

...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com