मराठा समाजाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री असंवेदनशील : नरेंद्र पाटील यांची टीका

सोलापूरच्या आक्रोश मोर्चानंतर राज्य शासनाने मराठा समाजाचे प्रश्न व आरक्षण हे दोन्ही विषय गांभीर्याने घ्यावेत. लवकरात लवकर त्याबाबत निर्णय व्हावेत. अन्यथा आंदोलने सुरूच राहतील.
मराठा समाजाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री असंवेदनशील : नरेंद्र पाटील यांची टीका
Chief Minister insensitive to the question of Maratha community: Narendra Patil's criticism

ढेबेवाडी : मराठा समाज्याला न्याय मिळण्यासाठी शासनाचे लक्ष वेधत असताना सोलापूर व अन्य ठिकाणी मराठा आक्रोश मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले, मात्र इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करणारे काँग्रेसचे नाना पटोले, अशोक चव्हाण, भाई जगताप यांच्यावर त्यांनी गुन्हे दाखल केलेत का? असा सवाल माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आज नवी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला. दरम्यान, मराठा समाजाबद्दल मुख्यमंत्री जराही संवेदनशील राहिलेले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. Chief Minister insensitive to the question of Maratha community: Narendra Patil's criticism

सोलापूर येथील आक्रोश मोर्चानंतर मराठा आरक्षण व विविध प्रश्नी शासनाचे लक्षवेधण्यासाठी रविवारी (ता.१८) मुंबईत मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून त्याची माहिती देण्यासाठी  आज माथाडी भवनमध्ये पत्रकार परिषद झाली.नरेंद्र पाटील म्हणाले,'कोरोनाचे कारण देवून सोलापुरात आमचा मोर्चा अडविला, गुन्हे दाखल केले.

आम्ही मराठ्यांच्या प्रश्नी मोर्चा काढला की कोरोना होतो आणि त्या नेत्यांनी इंधन प्रश्नी काढल्यावर कोरोना होत नाही का?.काहीही झाले तरी रविवारी मोटरसायकल रॅली निघणार म्हणजे निघणारच. राज्य शासन दिशाभूल करत असून स्वतःच्या जबाबदाऱ्या झटकत आहे. मराठा समाजाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री जराही संवेदनशील राहिलेले नाहीत.एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नऊ सप्टेंबरपुर्वी नोकरीवर रुजू करून घ्यायला हवे होते परंतु तसे झाले नाही.

आरक्षण गेले आता काय आणि कसे रुजू करणार आहात?. एकीकडे सारथीचा प्रश्न कायमच आहे, दुसरीकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधी मिळालेला नाही. महामंडळाची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. अलीकडे तर लाभार्थीना व्याज परतावा परत मिळेना झालाय अशा तक्रारी आहेत. सोलापूरच्या आक्रोश मोर्चानंतर राज्य शासनाने मराठा समाजाचे प्रश्न व आरक्षण हे दोन्ही विषय गांभीर्याने घ्यावेत. लवकरात लवकर त्याबाबत निर्णय व्हावेत. अन्यथा आंदोलने सुरूच राहतील. आम्ही पश्चिम महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात आंदोलनाचे नियोजन करतोय, त्यासंदर्भातील पुढचे पाऊल लवकरच जाहीर करू.  

''सोलापूरच्या आक्रोश मोर्चानंतर राज्यशासनाने मराठाआरक्षण व मराठा समाजाचे प्रश्न याबद्दल पाहिजे तेवढ्या गांभीर्याने घेतलेले दिसत नाही.रविवारची दुचाकी रॅली शासनाचे याप्रश्नी  लक्ष वेधण्यासाठी आहे. पुढचे आंदोलन लवकरच जाहीर करू''
 - नरेंद्र पाटील (माजी आमदार)

 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in