Eknath Khadse .jpg
Eknath Khadse .jpg

बीएचआर घोटाळ्यात नाव कोणाचे? : खडसे म्हणतात....

गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक केलेल्या संशयितांमध्ये उद्योजक, व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

जळगाव : राज्यभर गाजत असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून गुरुवारी राज्यभरात ठिकठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे कार्यकर्ते आणि जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती छगन झाल्टे यांच्यासह 12 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या राजकीय विरोधकांना उत्तर देत माझी चौकशी वैयक्तिक आणि आता बीएचआर गैरव्यवहाराची चौकशी राजकीय कशी असू शकते, असा सवाल केला आहे. (Eknath Khadse said about BHR malpractice)

एकनाथ खडसे जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते, यावेळी ते म्हणाले, बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी कुणाचे नाव आहे, याची मला माहिती नाही, यात जे कोणी असतील त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. तो लहान असो की मोठा असो, हा काय राजकीय विषय नाही. या चौकश्या होत राहतात. माझी लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी झाली. माझ्या अनेक चौकश्या झाल्या. आता माझी ईडी कडून चौकशी सुरू आहे.  

माझा काहीही गुन्हा नसताना माझी चौकशी हा राजकीय विषय होत नाही. मग आता बीएचआरची चौकशी राजकीय विषय कसा होवू शकतो. असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बीएचआरचा विषय राजकीय नाहीच, तो असंख्य ठेवीदारांचा प्रश्न आहे. त्यांच्या ठेवीच्या रकमा त्यांना परत मिळाल्या पाहिजेत, असेही खडसे यांनी सांगितले. 

दरम्यान, गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक केलेल्या संशयितांमध्ये उद्योजक, व्यापाऱ्यांचा समावेश आहे. यातील काही जण हे राजकीय व्यक्तींच्या जवळचे आहेत, त्यामुळे जळगावच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. जळगाव, औरंगाबाद, धुळे, अकोला, मुंबई, पुणे याठिकाणी हे छापे एकाचवेळी पडले आहेत. गुन्हे शाखेच्या 15 टीमकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com