सांगलीत चंद्रकांत दादा अपयशी आता जळगावात महाजनांची कसोटी  - BJP's power in Jalgaon Municipal Corporation is in danger due to split of BJP corporators | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

सांगलीत चंद्रकांत दादा अपयशी आता जळगावात महाजनांची कसोटी 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 मार्च 2021

सांगली महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अपयशी ठरले.

जळगाव : सांगली महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अपयशी ठरले. आता जळगाव महापालिकेच्या महापौर निवडणुकित भाजप नेते गिरीश महाजन यांची कसोटी लागली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी सांगलीत करेक्ट कार्यक्रम केला आता जळगावात खडसे गेम साधणार काय याकडेच लक्ष आहे.

जळगाव महापालिकेत सत्ताधारी भाजपचे तबल 31 नगरसेवक फुटल्याने महापौर निवडणुकीत भाजपचा पराभव होण्याची शक्यता असून शिवसेना डाव मारण्याची शक्यता आहे. महापौर पदाची निवडणूक असली तरी आता नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत शिवसेनेतर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे, लक्ष घालत आहे. तर भाजपचे उट्टे काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे सुध्दा मैदानात आहेत. कारण भाजपच्या फुटलेल्या नगरसेवकांच्या गटात त्यांना मानणारे नगरसेवक आहेत. यात महत्वाचे म्हणजे भाजप नेते संकटमोचक गिरीश महाजन यांची खरी कसोटी आहे. 

सचिन वाझेंनी जप्त केलेले पुरावे रेकॅार्डवरच घेतले नाहीत

महाजन यांनी नाशिक, नगर, धुळे महापालिकेत भाजपला सत्ता मिळवून दिली. जळगाव महापालिकेत त्यांनी 57 नगरसेवकांचे यश मिळवून सत्ता स्थापन केली. मात्र, अडीच वर्षानंतर महापौर निवडणुकीत नगरसेवक फुटल्याने यश मिळविण्याचे घरातच त्यांना आव्हान निर्माण झाले आहे. महाजन हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विस्वासू आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना महाजन यांनी त्यांना अनेकदा मदत केली. आता महाजन यांचे नेतृत संकटात आले आहे. जर महापौर निवडणुकीत भाजप पराभूत झाला तर महाजन यांच्यावर अपयशाचा ठपका लागेल यात जिल्ह्यात भाजपचे मोठे नुकसान होईल. खडसे यांचा वरचस्मा होईल. त्यामुळे भाजपला यश मिळविणे गरजेचे आहे.

भाजपने आता व्हिप जारी केला आहे. पक्ष जाहीर करेल त्या उमेदवाराला महापौर उपमहापौर पदासाठी ऑनलाईन मतदान करावे असे आदेश दिले आहेत. मात्र, आता 18 मार्चला मतदानात कसोटी आहे. महाजन यांच्या मदतीला देवेंद्र फडणवीस धावून येतात काय याकडेच साऱ्यांचे लक्ष आहे.

जर्मनी, इटली, स्पेनने कोरोना लशीचा वापर थांबवला
 

भाजपच्या फुटलेल्या नगरसेवकांची नावे जाहीर होत असून ती नावे अशी आहेत. 
संभाव्य 27 नगरसेवक
1 कुलभूषण
2 रंजना सपकाळे
3 प्रतिभा पाटील
4 प्रतिभा देशमुख
5 दिलीप पोकळे
6 किशोर बाविस्कर
7 रेश्मा काळे
8 चेतन सनकत
9 नवनाथ दारकुंडे
10 सुनील खडके
11 मनोज आहुजा
12 प्रिया जोहरे
13 रुकसनाबी खान
14 कांचन बाविस्कर
15 ललित कोल्हे
16 सिंधू कोल्हे
17 पार्वताबाई भिल
18 प्रवीण कोल्हे
19 अमित काळे
20 सुरेखा सोनवणे
21 हसीनाबी शेख शरीफ
22 गायत्री शिंदे
23 मीना धुडकू सपकाळे
24 चेतना चौधरी
25 ज्योती चव्हाण
26 रेखा चुडामण पाटील 
27 मीनाक्षी पाटील
28 सरिता नेरकर, 
29 दत्तू कोळी 
30 चंद्रशेखर पाटील 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख